16 April 2025 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Money Investment | आयुष्यभरासाठी आर्थिक चिंता मुक्त व्हायचे असल्यास ही योजना लक्षात ठेवा, फायदे-परतावा जाणून घ्या

Money Investment

Money Investment | तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. LIC ने तुमच्यासाठी एक योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे वृद्धापकाळ आर्थिकरित्या अधिक सुरक्षित करू शकता. LIC ने एक नवीन योजना सुरू केली असून तिचे नाव आहे, “जीवन शांती पॉलिसी”. LIC च्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक स्वतंत्र्यात आणि सुखात जगू शकता.

योजनेबद्दल थोडक्यात :
LIC जीवन शांती पॉलिसी ही LIC ची जुनी जीवन अक्षय योजनेसारखीच नवीन योजना आहे. तुमच्याकडे जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तात्काळ वार्षिकी आणि दुसरा पर्याय आहे स्थगित वार्षिकी. ही एक सिंगल प्रीमियम योजना म्हणून ओळखली जाते. पहिल्या पर्यायानुसार गुंतवणूक केल्यास तुम्हाला तात्काळ वार्षिकी अंतर्गत, पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. दुसरीकडे, डिफर्ड अॅन्युइटीच्या पर्यायामध्ये, पॉलिसी घेतल्यानंतर 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनी पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेतील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे पेन्शन लगेचही सुरू करू शकता.

पेन्शन सुविधा :
या योजनेंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित करण्यात आली नाही. तुमची गुंतवणूक, वय आणि स्थगिती कालावधीनुसार तुम्हाला मासिक पेन्शन दिली जाईल. गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल किंवा तुमचे वय जितके जास्त असेल तितके जास्त पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर किती टक्केवारी वाढ करत आहात त्यानुसार LIC तुम्हाला पेन्शन देईल.

योजनेचे लाभ :
LIC ची जीवन शांती पॉलिसी ही योजना किमान 30 वर्षे आणि कमाल 85 वर्षे वयाची व्यक्ती घेऊ शकते. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करण्याची किमान वय मर्यादा 30 वर्ष आणि कमाल वय मर्यादा 85 वर्ष निश्चित करण्यात आली आहे याशिवाय, जीवन शांती पॉलिसीमध्ये, पेन्शन सुरू झाल्यापासून 1 वर्षानंतर तुझी कर्ज घेण्यासाठी पात्र होणार. आणि पेन्शन सुरू झाल्यापासून 3 महिन्यांनंतर योजना सरेंडर केली जाऊ शकते. दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेताना वार्षिक व्याज दरांची हमी दिली जाईल त्यानुसार तुम्हाला परतावा मिळेल. या पॉलिसी अंतर्गत विविध प्रकारचे अॅन्युइटी पर्याय आणि अॅन्युइटी पेमेंट मोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु ही पॉलिसी घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा निवडलेला पर्याय पुन्हा बदलता येणार नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money investment Tips in LIC Jeevan shanti Policy for lifetime pension benefits on 18 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या