23 November 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Cancel Cheque | अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये तुमच्याकडे का मागितला जातो कॅंन्सल चेक? जाणून घ्या महत्वाचे कारण

Cancel Cheque

Cancel Cheque | सध्या सर्व जग डिजिटल होत चालले आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी आधि तासंतास बॅंकेत रांग लावून उभे रहावे लागत होते. पैशांचे कोणतेही व्यवहार करताना प्रत्याक्षात तिथे हजर रहावे लागत होते. मात्र आता सर्व डिजिटल सेवा उपलब्ध असल्याने पैसे २ मिनीटात पाठवता येतात. तसेच अनेक सुविधांचा लाभ डिजिटल माध्यमातून घेता येतो.

एकिकडे एवढी मोठी प्रगती होत असताना बॅंक, क्लास, प्रायवेट कंपन्या तुम्हाला कॅंन्सल चेक हमखास मागतात. आजही ही गोष्ट बदलेली नाही. त्यामुळे हा चेक मागतात तरी कशासाठी. कॅंन्सल चेक असल्याने तो तर बॅंकेत वठवता येत नाही तरी अनेक ठिकाणी त्याची मागणी का होते? त्याचा उपयोग काय आहे ही सर्व माहिती या बातमीतून जाणून घेऊ.

कशासाठी लागतो कॅंन्सल चेक
कॅंन्सल चेकवर तुम्हाला कोणतीही सही करायची नसते. त्यावर फक्त कॅंन्सल लिहून दोन तिरक्या रेशा आखून हा चेक द्यायचा असतो. यातून जरी पैसे काढता येत नसले तरी बॅंक आपल्या खात्याची माहिती घेऊ शकते. तसेच इतर कंपन्या देखील आपले खाते वेरिफाय करण्यासाठी कॅंन्सल चेक मागत असतात.

ही माहिती असते चेकवर
कॅंन्सल चेकचा अर्थ असा असतो की, त्या बॅंकेत तुमचे खाते आहे. यावर तुमचे नाव देखील असते. मात्र सर्वच चेकवर नाव दिलेले नसते. यावर अकाऊंट नंबर दिला जातो. तसेच ब्रांच IFSC  कोड असतो. यावर असलेल्या या माहितीमुळे कॅंन्सल चेकची मागणी केली जाते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कॅंन्सल चेक सहज देऊ नये.

कॅंन्सल चेकमधून पैसे काढता येतात का?
जर तुम्ही कोणाला कॅंन्सल चेक दिला असेल तर त्याच्या मध्यभागी कॅंन्सल चेक असे लिहायला हवे. या चेकचा वापर अकाऊंट तपासण्यासाठी केला जातो. त्यामुळे यातून पैसे पाढता येत नाहीत.

कॅंन्सल चेक कशासाठी महत्वाचा आहे
* जेव्हा तुम्ही बॅंकेत कार, घर, खासगी असे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता तेव्हा तुम्हाला या चेकची गरज पडते.
* प्रोविडेंट फंडातून ऑनलाईन पैसे काढताना कॅंन्सल चेकची गरज भासते.
* म्युच्यूल फंडात गुंतवणूक करताना देखील याची विचारणा केली जाते.
* कॅंन्सल चेक देताना निळ्या शाईचा पेन वापरावा इतर कोणत्याही शाईने हा चेक दिल्यास तो स्विकारला जात नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cancel cheque Demanded in the Digital World Important Reasons 19 October 2022.

हॅशटॅग्स

Cancel Cheque(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x