17 April 2025 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Home Loan | गृह कर्ज घेताना या गुप्त गोष्टी माहीत असल्यास तुमचे लाखो रुपये वाचतील, म्हणून हे लक्षात ठेवा

Home Loan

Home Loan |  अनेक व्यक्तींना आपल्या वारसा हक्कानुसार घर मिळते. मात्र यात आशाही अनेक व्यक्ती आहेत ज्यांना वारसा हक्कात घर मिळत नाही अथवा ते घर छोटे असते. त्यामुळे सर्वजण स्वकमाईतून घर खरेदी करण्यासाठी अपार मेहनत घेतात. ही मेहनत घेत असतान अनेकांना पैशांची चणचण भासते. त्यामुळे घरासाठी कर्ज घ्यावे लागते. कर्ज घेत असताना अनेक गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. त्यात अशाही काही बाबी आहेत ज्याने कमी व्याजात तुम्हाला कर्ज दिले जाते. आता घर खरेदी करताना तुम्हाला नेमका कुठे कुठे खर्च करावा लागतो याची माहितीही ठेवावी.

कुठे कुठे खर्च करावा लागेल
गृहकर्जासाठी अर्ज केल्यावर लगेचच कर्ज दिले जात नाही. त्या आधी अनेक गोष्टींवर खर्च करावा लागतो. यात प्रक्रिया शुल्का पासून ते मुद्र्क शुल्क आणि कायदेशीर होणारा सर्व खर्च तुम्हाला करावा लागतो. तसेच घराची तपासणी आणि कर्जाचा अर्ज याचा भार देखील तुमच्या खांद्यावर असतो. बॅंक तुम्हाला कर्ज देते मात्र त्यासाठी लागणा-या सर्व प्रोसेसचे पैसे तुम्हाला भरावे लागतात.

कर्ज घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा
जेव्हा गृह कर्ज हवे असते तेव्हा आपण बॅंक आणि गृहणिर्माण संस्थांवर अवलंबून असतो. त्यामुळे कोणतीही बॅंक किंवा गृहणिर्माण संस्थेची निवड करताना आधी अमेक ठिकाणी चौकशी करा. ब-याच ठिकाणी व्याजाचा दर कमी असतो पण प्रक्रिया शुल्क जास्त आकारले जाते. काही ठिकाणी प्रक्रिया शुल्क १० ते १५ हजार आकारावे लागते. तर काही ठिकाणी याचा दर तुमच्या कर्जावरील करमेच्या ०.५ टक्के असतो. जर तुम्ही जास्त बॅंकेत चौकशी केली तर तुम्हाला कुठे कोणत्या सुविधा आहेत हे समजेल आणि तुम्ही योग्य बॅंकेची निवड करू शकाला.

अजूनही आहेत बरेच खर्च
कर्ज घेताना बॅंक सहज कुणालाही कर्ज देत नाही. यात लागणा-या प्रक्रियेतील सर्व रक्कम तुमच्याकडून घेतल्यावरच कर्ज मंजूर केले जाते. यात कायदेशीर कर्ज, मालमत्ता तपासणी नोकरी आणि उत्पन्न तपासणी हे खर्च तर कारवेच लागतात. शिवाय नोटरी आणि मुद्रांक शुल्काचा खर्च देखील संभाळावा लागतो.

प्री-ईएमआयची देखील तयारी ठेवा
प्री-ईएमआयची गरज कर्ज मंजूर झाल्यानंतर लागते. म्हणजे जेव्हा बिल्डर कडे घर खरेदीसाठी तुम्ही जाता आणि कर्जावर घर घेण्याचा निर्णय घेता. यावेळी घेतलेले कर्ज जमा केल्यावर जर बिल्डर कडून तात्काळ घराचा ताबा तुम्हाला मिळाला नसल्यास बॅंक प्री-ईएमआय वसूल करते. यामध्ये फक्त व्याजाची रक्कम घेतली जाते. त्यामुळे गृह कर्ज घेताना या सर्व गोष्टी विचारात घेउनच कर्ज घ्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Home Loan Knowing these secrets while taking a home loan will save you lakhs of rupees 24 October 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Home Loan(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या