24 November 2024 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Money Growth | तुम्ही गुंतवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवल्यास कधीच भासणार नाही पैशांची चणचण

Investment Tips

Money Growth | पैसे एखाद्या ठिकाणी गुंतवताना वेगवेगळ्या बाजूने त्याचा आधी विचार करणे गरजेचे असते. तसे न केल्यास आपण केलेल्या गुंवणूकीचा अपल्याला काही काळाने त्रास होतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत असतात. चांगल्या दिवसांमध्ये योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर आपल्या वाईट काळात आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आज या बातमीतून गुंतवणूकीच्या काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.

आधी प्लॅनींग करा आणि मग इन्वेस्ट करा
कोरोना महामारीने अनेकांना योग्य बचतीचे महत्व समजावले आहे. कोणतीही गुंतवणूक करताना तुम्ही ती कशासाठी करत आहात हे आधी ठरवा. अनेक जण मुलांच्या लग्नासाठी पैसा जमवत असतात. अशा वेळी तुम्ही बचतीसाठी निवडलेली बॅंक किंवा योजना तुम्हाला हवे असलेल्या कालावधी पर्यंत पैसे व्याजासकट परत करणार की, नाही हे तपासून घ्या. तुमचे कारण निश्चित असेल तर गुंतवणूक करणे आणि त्यातून फायदा मिळवणे दोन्ही गोष्टी सहज साधता येतील.

जास्त परतावा कुठे मिळेल हे शोधा
प्रत्येक बॅंक अथवा बचत संस्था त्यांच्या सोईनुसार परतावा देत असतात. पीपीएफ किंवा एफडी अशा ठिकाणी मिळणारे रिटर्न हे म्यूच्युअल फंड सारख्या योजनांच्या तुलनेत कमी असतात. मात्र तिथे रिस्क जास्त असते. त्यामुळे निट विचार करुन तुम्ही तुमच्या गुंतवणूकीचा पर्याय निवडला पाहिजे.

पडताळणी करा
जेव्हा गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस, बॅंक असे पर्याय निवडतात तेव्हा जास्त जोखीम नसते. परंतू म्युच्यूल फंड आणि शेअर मार्केटमध्ये जोखीम जास्त असते. त्यामुळे ज्या कंपनीचे शेअर तुम्ही घेत आहात तिचे कामकाज, मार्केटमधील तिचा आलेख या सर्वांची पाहानी केल्यावरच गुंतवूक करा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

वेळेत गुंतवणूक सुरु करा
अनेक व्यक्ती आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. मात्र फक्त विचार करत बसल्याने फायदा होत नाही. त्यासाठी खरोखर गुंतवणूक सुरु करायला हवी. तुम्ही जितक्या लवकर पैसे वाचवणे सुरु कराल तितक्या लवर तुम्हाला फायदा होईल. कारण गुंतवणूकीचा कालावधी जितका जास्त असतो तितकाच मिळणारा फायदा जास्त कधी कधी दुप्पट असतो.

तुमचे ध्येय निश्चित ठेवा
आयुष्यात सुखाच्या मागे दुःख आहेच. त्यामुळे ज्यासाठी तुम्ही गुंतवणूक करत आहात त्याचे हप्ते बुडवू नका. हप्ते बुडवल्यास तुमचे नुकसान होइल. कितीही कठीण प्रसंग असला तरी तुम्हाला बचतीची रक्कम बाजूला ठेवायचीच आहे हे लक्षात ठेवा. ध्येय निश्चित असल्यास इतर चैनीच्या वस्तूंकडे देखील तुमचे लक्ष खेचले जाणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Money Growth Tips to get good returns from investments 20 October 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(143)#Money Growth(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x