22 November 2024 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Google Meet Updates | गूगल मीटमध्ये नविन फिचर दाखल, तुमची सर्व बातचीच होणार लिखित स्वरुपात रेकॉर्ड

Google Meet

Google Meet |  तंत्रज्ञानाच्या विशाल दुनियेत गूगलने आपले जाळे सर्वत्र पसरवले आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवताना अपण गुगल याच सर्च इंजीनचा वापर प्रामुख्याने करतो. यात गूगलने आपल्या वापरर्त्यांना विविध सेवा पुरवल्या आहेत. या सेवांच्या मदतीने दिवसातील अनेक कामे करणे खुप सोपे झाले. गुगल मिट हे फिचर माहीत नसलेली कोणतीच व्यक्ती नाही. कारण कोरोना काळात गुगलच्या या फिचरचा वापर शाळे पासून ते ऑफिस पर्यंत सर्वच ठिकाणी केला गेला.

दूर असलेल्या व्यक्तींना ऑफिसच्या मिटिंगसाठी याचा फार फायदा होतो. यात आपण व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही मार्फत जोडले जातो. तसेच आपले प्रेजेंटेशन देखील यावर सादर करता येते. आता गूगलने त्यांच्या या फिचरमध्ये आणखीन सुधारणा केली आहे. यात आता टेक्स ट्रांस्क्राइब सुरु करण्यात आले आहे.

टेक्स ट्रांस्क्राइब कशासाठी
जेव्हा आपण गूगल मिटवर एखादा महत्वाचा टॉपीक सांगत असतो अथवा त्यावर बातचीच करत असतो तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल. यात तुम्ही जे काही बोलत आहात ते सर्व टाईप करुण मिळेल. टाईप झालेला मजकूर तुम्ही गुगल ड्राइव्हमध्ये फाईल स्वरूपात सेव करू शकता. तसेच गरज पडेल तेव्हा तेथून तुम्ही तो वाचू शकता.

उपयोग आणि उद्देश
या फिचरचा उपयोग तुम्ही चालू गूगल मिट कॉलमध्ये करु शकता. तुमची सर्व माहिती साठवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. जेव्हा हे ऑप्शन ऑन केले जाईल तेव्हा उपस्थीत सर्वांना त्याचे नोटीफीकेशन मिळेल. आपल्या सुरक्षिततेचा विचार करुण हे फिचर तयार केले आहे.

खासीयत
विशेश म्हणजे २०० व्यक्ती एकाच वेळी मिटींगमध्ये असल्यास त्यांना मेल मार्फत साठवलेली फाइल मिळवता येईल. तसेच गूगल कॅलेंडरलवर तुम्ही याची ऑटो सेटींग देखील सेव करू शकता.

अटी
टेक्स ट्रांस्क्राइब फिचर ज्या व्यक्तीने मिटिंग सुरू केली आहे तिच व्यक्ती ऑन करू शकते. इतर व्यक्ती हे फिचर वापरू शकत नाहीत. २४ ऑक्टोबर पासून ही सेवा सुरू होत आहे. यात गूगल वर्कस्पेस, बिझनेस स्टॅंडर्ड, एंटरप्राइज स्टॅंडर्ड, एंटरप्राइज स्टर्टर, एंटरप्राइज प्लस, एज्यूकेशन प्लस अशा ठिकाणी याचा वापर करता येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Google Meet All your conversations will be recorded in writing 19 October 2022.

हॅशटॅग्स

Google Meet(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x