22 November 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Homemade Bleaching | केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे?, या टिप्स फॉलो करा

Homemade Bleaching Tips

Homemade Bleaching | स्वच्छ, निरोगी आणि चमकणारा चेहरा असावे असे प्रत्येकाला वाटते आणि असा चेहरा सर्वांचे लक्ष तुमच्याकडे खेचते. त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेचा रंग काळा पडतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेची सुंदरता सुधारायची असेल तर तुम्ही घर बसल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून म्हणजेच ब्लीचिंग लावून चेहऱ्यावर चमक आणू शकता. तसेच या नैसर्गिक ब्लीचिंगमुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचा स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसू लागते. हे नैसर्गिक ब्लीचिंग बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा जास्त प्रभावी आहे यामध्ये कोणताही वाद नाही. या घरगुती प्रोडक्टमुळे तुम्ही त्वचेवरील नको असलेले केस देखील काढू शकता. तसेच या ब्लीचचे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची काहीही भीती नसते. तर चला आज आपण नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे ते जाणून घेऊयात.

ऑरेंज पील ब्लीचिंग:
संत्र्याच्या सालीपासून बनवलेले ब्लीच त्वचेसाठी सर्वांत उपयुक्त ठरते तसेच संत्र्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते, आणि ज्यामुळे त्वचा स्वच्छ राहते. दरम्यान, संत्र्याच्या सालीपासून ब्लीच बनवण्यासाठी संत्र्याची वाळलेली साले बारीक करून त्याची पावडर बनून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा मध, 5-6 थेंब गुलाबजल एक चमचा पावडरमध्ये मिसळून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा. चेहरा वाळल्यानंतर थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने करा.

बटाट्यापासून ब्लीचिंग करा:
बटाटा त्वचेवर खूप गुणकारी आहे कारण यामध्ये असलेले नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म त्वचेची टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात. तर ब्लीच बनवण्यासाठी बटाटा सोलून कापून मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घ्या. तसेच त्यामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब टाका आणि चेहऱ्यापासून मानेपर्यंत ही पेस्ट चांगली लावा. पेस्ट सुकल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

टोमॅटोपासून ब्लीच पॅक बनवा:
टोमॅटोपासून ब्लीचिंग फेस पॅक बनवण्यासाठी टोमॅटोमधील गर काढून टाका आणि राहिलेला टोमॅटो चांगला मॅश करा. चाळणीत गाळून त्याचा रस वेगळा काढा व या रसामध्ये 1 चमचा दही घाला तेव्हा ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या आणि हा फेसपॅक नियमित लावल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होईल तसेच त्वचेचे डाग कमी होतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Homemade Bleaching Tips to look beautiful checks details 18 October 2022.

हॅशटॅग्स

Homemade Bleaching(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x