17 April 2025 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Stocks To Buy | पुढची दिवाळी भरभराटीची करायची आहे?, मग या दिवाळीत हे स्टॉक खरेदी करा आणि संयम बाळगा, लिस्ट सेव्ह करा

Stocks to Buy

Stocks To Buy| भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हा वर्ष फार निराशादायक राहिला आहे. 2021 च्या दिवाळीपासून आतापर्यंत सेन्सेक्समध्ये 4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. उच्च चलनवाढ, महागाई, मध्यवर्ती बँकांची कठोर व्याज दरातील वाढ, भू-राजकीय तणाव आणि युद्ध याचा विपरीत परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. परंतु गुंतवणूक तज्ञ अजूनही स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. सध्याच्या पडत्या किंमत पातळीवर स्टॉक खरेदीच्या भरपूर संधी पाहायला मिळत आहे. म्हणून शेअर मार्केट तज्ञांनी तांत्रिक घटकांवर आधारित सात मिडकॅप शेअरची यादी जाहीर केली आहे, जे दीर्घकाळासाठी खरेदी केले जाऊ शकतात.

KPIT Tech :
KPIT टेक कंपनीचा शेअर सध्या 664 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. यासाठी JM फायनान्सने 830 रुपयेची लक्ष किंमत निर्धारित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक पुढील येणाऱ्या काळात सध्याच्या पातळीपासून 25 टक्के अधिक वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस/CAMS :
ही एक म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सी आहे. या कंपनीचा शेअर सध्या 2607 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी 3300 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीवर 26.6 टक्के अधिक वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 12,773.6 कोटी रुपये आहे.

शेफलर इंडिया :
Schaeffler India कंपनीचा शेअर सध्या 3211 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 4045 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 26 टक्क्यांनी जास्त वाढू शकतो. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 50,192.23 कोटी रुपये आहे. जेएम फायनान्शिअलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचा विकास अतिशय जलद गतीने होत आहे. शेफलर इंडिया देशांतर्गत विद्युतीकरण व्यवसायाचा आणि संकरीकरणाच्या ट्रेंडचा मोठा फायदा घेऊ शकते.

प्राज इंडस्ट्रीज :
प्राज इंडस्ट्रीजचा स्टॉक सध्या 439.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मात्र यासाठी ब्रोकरेज फर्मने 550 रुपयेची लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 20 टक्क्यांनी वाढू शकतो. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 8,074 कोटी रुपये आहे. आणि तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

दीपक नायट्रेट :
दीपक नायट्रेटचा स्टॉक सध्या 2263 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 2730 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 20.6 टक्के अधिक वाढी शकतो. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 30,864.38 कोटी रुपये असून तज्ञांनी यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट :
चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्सचा कंपनीचा स्टॉक सध्या 738 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 950 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 28.7 टक्क्यांनी वाढू शकतो. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 60,630.7 कोटी असून ब्रोकरेज फर्म या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक आहे.

मेट्रो ब्रँड्स :
मेट्रो ब्रँड कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 922 रुपये आहे. या स्टॉकसाठी 1070 रुपये लक्ष किंमत देण्यात आली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 16 टक्क्यांनी वाढू शकतो. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 25,033.4 कोटी रुपये आहे. मेट्रो ब्रँडकडे दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वात मजबूत ब्रँड इक्विटी आहे. उत्तर आणि पूर्व भारतात त्यानी चांगला उद्योग विस्तार केला आहे. JM फायनान्शिअलच्या मते, मेट्रो ब्रँडचा स्टोअर आणि आउटलेटचा विस्तार, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि नवीन तसेच विद्यमान ब्रँड्सच्या यशस्वी स्केल-अपमुळे कंपनीला जबरदस्त फायदा होत आहे. फुटवेअर रिटेल सेगमेंट मेट्रो ब्रँड सर्वात अग्रणी स्थानावर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to Buy has declared by JM financial for short term on 19 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या