19 April 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

RK Damani Stock | आरके दमानींच्या फेव्हरेट स्टॉकने 1290 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, हा शेअर खरेदी करणार?

RK Damani Stock

RK Damani Stock | सुपरमार्केट चेन एव्हेन्यू सुपरमार्ट/डी-मार्टने शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 1290 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचा IPO बाजारात आणणे राधा किशन दमाणी यांच्यासाठी गेम चेंजर ठरले आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा शेअर सूचीबद्ध झाल्यापासून इश्यू किमतीच्या तुलनेत 1290 टक्क्यांनी जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 2.68 लाख कोटी रुपये आहे. तिमाही निकालानंतर काही ब्रोकरेज हाऊसेसनी शेअरची किंमत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ज्या स्टॉकने दमानी यांना श्रीमंतांच्या यादीत बसवले आहे, त्यात तुम्ही पैसे लावणार का?

ब्रोकरेज हाऊसचे मत :
ब्रोकरेज हाऊस सेंट्रम ब्रोकिंग एव्हेन्यू सुपरमार्ट्सवर Dmart स्टॉक बाबत सकारात्मक आहेत. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकची लक्ष किकत 5205 रुपये निश्चित केली आहे. हा शेअर आज 4125 रुपयांवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की या कंपनीचे व्यवस्थापक कौशल्य सर्वात चांगले असल्यामुळे कंपनीला त्याचा फायदा होत आहे. भारतातील किरकोळ संघटित किराणा उद्योगाचा आकार सध्या असंघटित क्षेत्राच्या तुलनेत फक्त 5 टक्के आहे. म्हणजेच त्यात येणाऱ्या काळात वाढीची प्रचंड क्षमता दिसून येत आहे. हा स्टॉक सध्या 85x FY25 EPS च्या मुल्यांकनावर ट्रेड करत असून त्यात अपट्रेंड येण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस JM फायनान्शिअलने DMart कंपनीच्या स्टॉकवर BUY रेटिंगसह 4535 रुपयेची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सध्या कंपनीची वाढ स्थिर होत आहे. कोरोना महामारीनंतर DMart चा व्यवसाय काही पटींनी वाढला आहे. कंपनीची मागील काही काळातील मार्जिन कामगिरी देखील मजबूत दिसून येत आहे. ब्रोकरेज हाऊस येस सिक्युरिटीजने या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून 4971 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

वाढते तिमाही प्रदर्शन :
सप्टेंबर तिमाहीतील जाहीर आकडेवारीनुसार DMART ची वार्षिक विक्री 36 टक्क्यांनी वाढली आहे. सकल/EBITDA मार्जिन 14.5 टक्के आणि 8.6 टक्के दरम्यान आहे. EBITDA/PBT/PAT मध्ये 33.5/32/63 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. DMART ची मागील 3 वर्षांची CAGR विक्री, EBITDA आणि PAT अनुक्रमे 20/20/30 टक्के नोंदवली गेली आहे.

अव्हेन्यू सुपरमार्ट्स व्यवसाय वाढ :
राधाकिशन दमानी यांनी 5.5 वर्षांपूर्वी अव्हेन्यू सुपरमार्टला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची योजना आखली होती. 21 मार्च 2017 रोजी DMart चा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. IPO इश्यूमध्ये एका शेअरची किंमत 299 रुपये जाहीर करण्यात आली होती. त्याच वेळी IPO ओपनिंगमध्ये हा स्टॉक 642 रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाला होता. म्हणजेच स्टॉक 100 टक्के पेक्षा जास्त प्रीमियमसह सूचीबद्ध झाला होता. सध्या हा स्टॉक 4125 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना IPO किमतीच्या तुलनेत 1290 टक्के अधिक परतावा मिळाला असणार. मार्केट कॅपच्या बाबतीत, एव्हेन्यू सुपरमार्ट ही बाजारातील टॉप रिटेल कंपन्यांपैकी एक लोकप्रिय कंपनी आहे.

IPO नंतर दमानी यांची संपत्ती :
जुलै 2016 मध्ये राधा किशन दमानी यांची संपत्ती 9281 कोटी रुपये होती. जुलै 2017 मध्ये दमानी यांची संपत्ती अनेक पटींनी वाढून 29,700 कोटी रुपयेवर पोहोचली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 1.27 लाख कोटी रुपयेपर्यंत गेली होती. सध्या त्यांची एकूण संपत्ती 1.53 लाख कोटी रुपये नोंदवण्यात आली आहे. एक मजबूत उद्योगपती असण्यासोबतच RK दमानी शेअर बाजारातील एक मोठे गुंतवणूकदार म्हणूनही लोकप्रिय आहेत. 2002 मध्ये त्यांनी डी-मार्टचे पहिले स्टोअर सुरू केले होते, आणि आता त्याचा व्यवसाय पूर्ण भारतात पसरला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| RK Damani Stock Avenue Supermarket known as DMart Share price return on investment on 19 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RK Damani Stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या