23 November 2024 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Money Making IPO | एक नंबर, स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवशी 24 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?

IPO Money

Money Making IPO | खाजगी मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म Tracxn Technologies कंपनीच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. IPO मध्ये या स्टॉकची किंमत 80 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र स्टॉक BSE निर्देशांकावर 83 रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. त्याच वेळी, सूचीबद्ध झाल्यानंतर, शेअरची किंमत एका दिवसात 99 रुपयांपर्यंत वाढली होती. म्हणजेच, हा स्टॉक IPO इश्यूच्या किमत बँड पेक्षा 24 टक्के प्रिमियमवर ट्रेड करत होता. म्हणजेच ज्या लोकांनी या IPO मध्ये पैसे लावले होते त्यांना एका झटक्यात 24 टक्के नफा मिळाला आहे. सध्याच्या अस्थिर बाजारातील काळात चांगला परतावा मिळाल्यानंतर काय करावे? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर

शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी का? :
शेअर बाजारातील विश्लेषक आणि तज्ञ सल्ला देतात की Tracxn Technologies Ltd कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त एंट्री झाली, आणि नंतर स्टॉक कमालीचा वाढला. या स्टॉकचे उच्च मूल्यांकन, कमकुवत सदस्यता आणि इश्यूचे OFS स्वरूप यामुळे स्टॉकची लिस्टिंग अपेक्षेपेक्षा कमी झाली. ही कंपनी जागतिक स्तरावरील एक आघाडीची IT सेवा प्रदाता कंपनी आहे. तथापि, जागतिक महागाई दर वाढीमुळे, अमेरिका आणि युरोप सारख्या प्रमुख बाजारपेठांमधील मंदीची परिस्थिती, खाजगी इक्विटी बाजारातील पडझड, कमजोर भांडवल बाजार, गुंतवणूक बँका आणि कौटुंबिक कार्यालये यांचे कमजोर प्रदर्शन, याचा स्टॉकवर विपरीत परिणाम पडला आहे. या सर्व नकारात्मक घटकामुळे कंपनीचा क्लायंट बेस वाढवण्यात अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्याचबरोबर या उद्योग क्षेत्रातील स्पर्धाही अतिशय कठीण आणि आव्हानाची आहे. Crunchbase, CBIsights, PrivCo आणि Pitchbook सारख्या अनेक कंपन्या स्पर्धेसाठी आव्हाने निर्माण करत आहेत. ज्या लोकांनी शॉर्ट प्रॉफिट हे शेअर्स घेतले आहेत त्यांनी 79 रुपयेवर स्टॉप लॉस लावावा. तर नवीन गुंतवणूकदार काही महिने प्रतीक्षा करु शकता, आणि प्रॉफिट बुक करू शकता.

कंपनीतील जोखमीचे घटक :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष Q1FY23 साठी कंपनीचे मूल्य 240x P/E आणि 10.9x MCap आहे. यासोबत कंपनीत गुंतवणूक करण्याचे काही धोकेही आहेत. उदाहरणार्थ, शेअरचे अट्रिशन रेट उच्च आहे. प्लॅटफॉर्ममधील सामग्रीतील दोष किंवा त्रुटी कंपनीच्या व्यावसायिक संभावनांवर नकारात्मक परिणाम करू शकतात. कंपनी फ्री सोर्स सॉफ्टवेअर वापरते, जे कायद्याच्या अधीन आहे.

IPO ला मिळालेला प्रतिसाद:
Tracxn Technologies कंपनीच्या IPO ला लोकाकडून सुस्त प्रतिसाद मिळाला होता. हा IPO फक्त 2.01 पट सबस्क्राईब झाला होता. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 15 टक्के होता, पण तो फक्त 0.87 पट अधिग्रहित झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला होता, आणि तो 487 टक्के म्हणजेच 4.87 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या IPO मध्ये, 75 टक्के कोटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता, आणि तो 1.66 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making IPO Tracxn Technologies share price return on investment in IPO on 21 October 2022.

हॅशटॅग्स

#IPO Money(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x