22 January 2025 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

Stock In Focus | एक बातमी आली आणि सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी, 7 दिवसांत 33 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करणार?

Stock in Focus

Stock in Focus| बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने रॉकेटसारखी झेप घेतली. स्टॉक 20 टक्केच्या वाढीसह 9.25 रुपयांवर ट्रेड करत होता. राइट्स इश्यूनंतर या शेअरने मागील आठवड्यातच आपल्या शेअर धारकांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला होता. मात्र, हा स्टॉक रॉकेटसारखी झेप घेण्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी समूहाकडून मिळालेली मोठी ऑर्डर. अदानी ग्रीन एनर्जीने सुजलोंन एनर्जीला 48.3 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन ऑर्डर दिली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरने जबरदस्त तेजी पकडली.

सुझलॉन एनर्जी शेअरचा इतिहास :
जर तुम्ही आठवड्यापूर्वी सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 133000 रुपयांपेक्षा जास्त झाले असते. फक्त एका आठवड्यात या स्टॉक ने 33 टक्के परतावा दिला आहे. तथापि, स्टॉकने मागील एका महिन्यात 4.52 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

शेअर्सची वाटचाल :
सुझलॉन एनर्जीने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 41.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. कंपनीची मागील एका वर्षात कामगिरी जबरदस्त राहिली होती.या कंपनीने एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात स्टॉकमध्ये 262 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 12.02 रुपये होती, तर नीचांकी पातळी किंमत 5.41 रुपये होती.

कंपनीचा समृद्धीचा काळ :
एक काळ होता जेव्हा सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 390 रुपयांपेक्षा अधिक होती. 11 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 390.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर एकाच वर्षात शेअरमध्ये जबरदस्त घसरण झाली आणि 26 डिसेंबर 2008 रोजी स्टॉक 52.20 रुपयांवर आला. 10 जानेवारी 2020 रोजी सुझलॉन एनर्जीचा शेअर 2.39 रुपयांच्या खाली ट्रेड करत होता. 14 वर्षांपूर्वी जेर तुम्ही या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आता एक लाखाचे 8000 रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock in Focus of Suzlon Energy share price return on investment on 21 October 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x