11 January 2025 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल
x

Idli Dosa ATM | अरेच्चा आता एटीएममधून चक्क इडली-डोसा मिळणार, भूकेवर सापडला मॅगी पेक्षाही झटपट उपाय

Idli Dosa ATM

Idli Dosa ATM |  सध्या ततंत्रज्ञानाचा विकास मोठा झपाट्याने होत आहे. अशात तुम्ही आजवर एटीएममधून भरपूर पैसे काढले असतील. मात्र याच एटीएम मशीनमधून तुम्ही कधी इडली काढली आहे. नाही ना. पण आता ते शक्य आहे. कारण 1 मिनिटाच्या आत गरमागरम इडली आणि मेदुवडा देणारी एक एटीएम मशिन बनवण्यात आली आहे.

आपल्याला भूक कधी लागेल काही सांगता येत नाही. अनेक व्यक्ती कामावरून कधी कधी खूप उशिरा घरी येतात. अशात घरी आल्यावर जेवण बनवण्याची इच्छा नसते. तसेच एवढ्या रात्री कोणते हॉटेल सुरू असेल याची शक्यता कमी असते. यासह होम डिलिव्हरी मिळणे देखील कठीण. त्यामुळे यावेळी तुम्हाला झटपट मिळणाऱ्या जेवणाची खूप गरज असते. ही मशीन याच साठी बनवण्यात आली आहे.

हॉस्टेलवर जेवणाच्या वेळा निश्चित असतात. जर वेळ चुकवली तर जेवण मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी इलेक्ट्रिक गॅसवर मॅगी बनवून खातात. ही मशीन अशा विद्यार्थ्यांच्या देखील खूप फायद्याची आहे. तिचा वापर करणे देखील खूप सोपे आहे. काही सेकंदात ही मशीन तुम्हाला गरमागरम इडली आणि मेदुवडा बनवून देते.

या मशीनचा वापर करताना तुम्हाला फक्त यात दिलेला कोड स्कॅन करायचा आहे. कोड टाकल्यावर तुमच्या समोर त्यांचे मेनू कार्ड ओपन होते. त्यावर तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही निवडू शकता. त्यानंतर ही मशीन स्वतः तो पदार्थ बनवते. 55 सेकंदात हे गरम पदार्थ तुम्हाला मिळतात. यामुळे रात्री अपरात्री लागलेल्या भुकेवर पर्याय मिळाला आहे.

या मशीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मशीन फ्रेश हॉट नावाच्या स्टार्टअप कंपनीने तयार केली आहे. बंगळुरूमध्ये याची सेवा सुरू करण्यात आली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. त्यामुळे लवकरच सगळीकडे हे एटीएम मशीन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यात तुमची तुमचे पदार्थ कसे बनले जात आहेत हे देखील पाहू शकता. मशीनच्या बाहेर असेलल्या एका सूचना पट्टीवर आतमध्ये सुरू असलेल्या प्रोसेसची माहिती मिळते. तसेच याचे पेमेंट देखील फोन वरून करता येते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे प्रत्यक्षात काम कसे करते हे तुम्ही पाहू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Idli Dosa ATM Have you seen an ATM that offers Idli Dosa 22 October 2022.

हॅशटॅग्स

Idli Dosa ATM(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x