5 February 2025 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
x

Stolen Smartphone | तुमचा स्मार्टफोन अचानक चोरी झाल्यास गोंधळ उडेल ना? त्यावेळी स्मार्टफोन असा करा ब्लॉक करून सुरक्षीत करा

Stolen Smartphone

Stolen Smartphone | आपल्या रोजच्या जिवनात फोन जास्त प्रमाणात संवाद साधण्यापेक्षा अन्य कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे कधी फोन हरवला तर आपली अनेक कामे रखडतात. अशात फोनमध्ये आपले फोटो, कॉन्टॅक नंबर, बॅंकेचे खाते आणि इतर अन्य गोष्टी असतात. अनेक व्यक्ती विसराळू स्वभावामुळे वेगवेगळे पासवर्ड चॅट बॉक्समध्ये लिहून ठेवतात. अशात जर फोन हरवला तर होणा-या नुकसानापेक्षा फसवणूकीची आणि माहिती लिक होण्याची जास्त शक्यता असते.

आजकाल आपली माहिती दुस-या व्याक्तीच्या हातात जाणे ही खुप मोठी हाणी आहे. यामुळे आपले मोठे नुकसान आणि बदणामी केली जाऊ शकते. आपले फोटो समोरच्या व्यक्तीला मिळाले तर त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. तसेच बॅंकेतील सर्व पैसे देखील हडपले जाऊ शकतात. मात्र तुम्ही तुमचा फोन ब्लॉक केला तर होणारा प्रकार रोखता येतो.

फोन चोरी झाल्यावर तो परत मिळवणे आपल्या हातात नसते. मात्र आपण तो ब्लॉक केला तर आपली माहिती समोरच्याला मिळत नाही. CIER मार्फत आपला फोन ब्लॉक करता येतो. यातील IMEI या क्रमांकाची फोन ब्लॉक करण्यास खुप मदत होते.

चोरी झालेला फोन असा करा ब्लॉक
फोन ब्लॉक करण्यासाठी तुमच्या डिवाइजवर CIER सर्च करा. यावर तुम्हाला एका पेजवर फॉर्म मिळेल. यात तिन सेक्शन दिलेले असतील. ज्यात डिवाइज इंफॉर्मेशन, लॉस्ट इंफॉर्मेशन, पर्सनल इंफॉर्मेशन आणि मोबाइल ओनर असे पर्याय असतील.

यातील डिवाइज इंफॉर्मेशन हा पर्याय निवडून त्यात चोरी झालेल्या फोनची माहिती भरावी. ज्यामध्ये मोबाइल क्रमांक आणि IMEI क्रमांक टाकावा. त्यानंतर लॉस्ट इंफॉर्मेशन पर्याय निवडा पुढे तुमच्या फोनचा डेटा आणि ज्या पोलिस ठाण्यात तुम्ही फोन चोरीची तक्रार केली आहे ती माहिती भरावी. त्यानंतर शेवटी चोरी झालेला फोन ज्याचा आहे त्याचे नाव, इमेल आयडी ही माहिती भरा.

त्यानंतर एक डिक्लेरेशन बॉक्स येईल. त्यावर क्लीक करून गेट ओटीपी निवडा. दिलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी देखील टाका. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. असे केल्यावर तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी मिळेल. त्याने तुमचा ब्लॉक करता येईल.

IMEI नंबर प्रत्येकासाठी वेगळा
International Mobile Equipment Identity म्हणजेच IMEI मध्ये एक १५ अंकी क्रमांक असतो. हा क्रमांक प्रत्येक फोनसाठी वेगवेगळा असतो. त्यामुळे याच्या आधारे आपल्याला फोन ब्लॉक करता येतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stolen Smartphone Block your phone after theft 21 October 2022.

हॅशटॅग्स

Stolen Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x