22 November 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

EPF e-Nomination | हलक्यात घेऊ नका भाऊ, नोकरदार ईपीएफ खातेदारकांनी इ-नॉमिनेशन न केल्यास किती नुकसान होईल ठाऊक आहे?

EPF E-nomination

EPF e-Nomination| प्रत्येक कर्मता-याचे पीएफ खाते असते. त्यात आपल्या पगारातील काही टक्के रक्कम ठेवली जाते. याचा प्रत्येक कर्मचा-याला फायदा होतो. अशात आता पीएफ खात्याला नॉमिनी लावणे बंधणकारक केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पिएफ खात्याला अजूनही नॉमिनी जोडला नसेल तर ही बातमी संपूर्ण वाचा. कारण तसे केले नसल्यास EPFO तुम्हाला अनेक सेवांपासून दूर करते. यात तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. इ नॉमिनेशन नसेलतर शिल्लक ऑनलाइन तपशील तपासता येत नाही. तसेच यासाठी अप्लाय करणे फार मोठी प्रोसेस नाही. खूप कमी वेळेत तुम्ही यासाठी अप्लाय करु शकता.

ई नॉमिनेशन केल्याने तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून दिले आहे त्याला तुमचा मृत्यू झाल्यास हे पैसे दिले जातात. त्यामुळे पीएफ खातेदाराने इ-नामांकन करणे गरजेचे आहे. जर तसे केले नाही आणि भविष्यात खातेदार सेवेवर असताना त्याचा मृत्यू झाला तर पीएफचे पैसे त्याच्या कुटूंबीयांना दिले जात नाहीत. हे पैसे मिळवण्यासाठी नंतर खुप खटापटी करण्यापेक्षा आधीत तुमच्या पीएफ खात्याला ई-नॉमिनेशन करुण घ्या. तसे केल्यानंतर भविष्यात पेंन्शन, विमा, ऑनइन क्लेम याचे फायदे होतील. यासाठी संबंधीत खातेदारकाकडे यूएएन आणि मोबाइल नंबर लींक असणे आवश्यक आहे.

जर पीएफ खातेदाराला कुटूंब नसेल तर अशावेळी ती व्यक्ती इतर कोणालाही नॉमिनी करू शकते. मात्र कुटूब असेल तर असे करता येत नाही. तसेच नॉमिनी न केल्यावर नंतर त्यावर अधिकार असलेल्यांना दिवाणी न्यायालयात देखील जावे लागते. तसेच कुटूंब नसल्यास इतर कोणाला नॉमिनी करताना त्या व्यक्तीचा पत्ता पडताळला जातो. हा पत्ता चुकिचा असल्यास त्याचे नॉमिनी म्हणून अधिकार रद्द केले जातात.

ई-नामांकणासाठी असे करा ऑनलाइन अप्लाय
* यासाठी epfindia.gov.in या EPFO च्या संकेत स्थळावर भेट द्या.
* त्यानंतर सेवा मध्ये तुम्हाला ड्रॉपडाउन मेन्यू दिसेल.
* त्यातील कर्मचा-यांसाठी असलेल्या टॅबवर क्लीक करा.
* तुमच्या UAN अकाउंटला लॉगइन करा.
* मॅनेड टॅबवर इ-नामांकन निवडा.
* यात तुमचा कायम आणि वर्तमान असे दोन्ही पत्ते प्रविश्ट करा.
* त्यानंतर योग्य तो तपशील भरा आणि ई-साइनवर क्लीक करा.
* शेवटी तुमचा संपर्क क्रमांक विचारला जाइल. त्यावर आलेला ओटीपी टाकल्यावर तुम्हाला प्रक्रीया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : EPF E-nomination is mandatory for EPF account holders otherwise there will be huge losses 25 October 2022.

हॅशटॅग्स

#EPF E-Nomination(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x