24 November 2024 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

NA Plot Deal | 'NA प्लॉट' खरेदी करणार आहात? बिगरशेती भूखंड खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...

NA Plot Deal

NA Plot Deal | घर खरेदी करण्यासाठी अनेक व्यक्ती थेट बांधकाम झालेले घर खरेदी करतात. तर काही जण NA प्लॉट खरेदी करतात. यात अनेक वेळा फसवणूक केली जाते. त्यामुळे NA प्लॉट खरेदी करताना अनेक गोष्टी तपासून घेणे गरजेचे असते. तर आज या बातमीतून कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहीजेत हेच जाणून घेणार आहोत.

जेव्हा तुम्ही बिगरशेती भुखंड खरेदी करता तेव्हा आधी तो भूखंड त्याच व्यक्तीच्या नावे आहे की नाही हे तपासून घ्या. हे तपासताना त्या जमिनीचा ७/१२ उतारा तसेच फेरफार नोंदणी पहावी. कारण ७/१२ उता-यावर सर्व गोष्टींची नोंद केलेली असते. यामध्ये जमिनीवर घेतलेले कर्ज आणि इतर कोणत्याही संस्था किंवा बॅंकेच्या ठेवीची नोंद केलेली असते. तसेच ती जमिन कुठे गहान ठेवली आहे याचा तपशील देखील असतो. या पैकी कोणतीही गोष्ट त्यात असेल तर ती जमिन खरेदी करू नका.

यासह बिगरशेती भूखंड मोजणी कार्यालयात याची नोंद आहे का हे तपासावे. जर जमिनिवर एखादे कर्ज घेउन ते फेडल्याचे सांगितले असेल तर त्याची देखील शहानीशा करावी. त्या व्यक्तीने खरोखर हप्ते वेळेत भरलेत का? कर्जाची रक्कम थकित आहे का? हे पाहावे. तसेच एका नामांकीत वृत्तपत्रात याची माहिती प्रसारीत करावी. त्यावर कोणाची हरकत नसेल तरच जमिन खरेदीचा निर्णय घ्यावा.

बिगरशेती भूखंड खरेदी आधी तो भाग पूरनियंत्रण कक्षेत येतो का? तेथील वातावरण कसे आहे, विद्यूत वाहक मुळ तारा तेथे आहेत का?  जास्त पाऊस आल्यास तेथे पाणि भरते का? आजूबाजूच्या परिसरात डंपींग ग्राउंड आहे का? याची शहानीशा करावी.

तसेच कचरा, सांडपाण्याचा निचरा, दळणवळणाच्या सुविधा, पाणी, विज, शाळा, रस्ते या सेवा कशा आहेत हे पाहावे. तसेच त्या जमिनीला महानगरपालीकेची मान्यता आहे का? हे तपासून घ्यावे. कायदेशीर अडचणींना दूर ठेवण्यासाठी अशी जमिन खरेदी करताना कायदेशीर सल्लागाराचा सल्ला नक्की घ्यावा.

तुकडे बंदी या महसूल विभाच्या कायद्या नुसार ठरावीक क्षेत्राची जमिन खरेदी करता येत. मात्र तुम्ही त्या पेक्षा कमी अथवा जास्त जमिन घेत असाल तर त्याचे दोन प्लॉट तयार करा. नंतर त्यावर जिल्हाधिका-याची मंजूरी मिळवा. तसे केल्यावर देखील तुम्ही बिगर शेती भूखंड खरेदी करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : NA Plot Deal Must read this information before buying non-agricultural land 31 March 2023.

हॅशटॅग्स

NA Plot Deal(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x