22 November 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Multibagger Stocks| या खाजगी बँकेच्या शेअरचे गुंतवणुकदारांना करोडपती बनवले,1 लाखावर दिला 5.53 कोटी परतावा, तुम्ही हा स्टॉक घेतला आहे का?

Multibagger stock

Multibagger Stocks| कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स जवळपास वर्षभरापासून बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहेत. तथापि या बँकिंग कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कोविड नंतरच्या तेजीत कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरची किंमत 1175 वरून वाढून 1905 रुपये पर्यंत गेली आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये जवळपास 60 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तथापि, जर तुमचा गुंतवणूकीचा दृष्टीकोन खूप लांब असेल तर तुम्हाला या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास लाभांश आणि बोनस शेअर्सदेखील मिळू शकतो.

1:1 बोनस शेअर्स :
भरघोस लाभांश देणाऱ्या या बँकिंग कंपनीच्या स्टॉकने 2008 पासून सातत्याने आपल्या शेअर धारकांना लाभांश वितरीत केला आहे. दरम्यान कंपनीने 1:1 बोनस शेअर्स वितरीत करण्याची ही घोषणा केली होती. जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये 20 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर ती आता तुमची गुंतवणूक 500 पटीने अधिक वाढली असती.

कोटक महिंद्रा बँकेचा बोनस शेअरचा इतिहास :
या बँकिंग कंपनीच्या स्टॉकने 2008 पासून सातत्याने त्यांच्या आपल्या शेअर धारकांना लाभांश वितरीत केले आहे. दरम्यान, या बँकेने जुलै 2015 मध्ये आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच एका प्रत्येक विद्यमान शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्यात आला होता. अशा प्रकारे, 1:1 बोनस शेअर्स जारी केल्यानंतर गुंतवणूकदाराची शेअरहोल्डिंग दुप्पट झाली होती.

करोडोंचा परतावा :
वीस वर्षांपूर्वी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 6.88 रुपयेच्या किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये वीस वर्षांपूर्वी एक लाख रुपये लावले असते तर तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेचे 14,534 शेअर्स मिळाले असते. 1:1 बोनस शेअर्स जारी केल्यानंतर, तुमची शेअरहोल्डिंग 29,068 शेअर्स एवढी झाली असती. आज कोटक महिंद्रा बँकेच्या एका शेअरची किंमत 1905 रुपये आहे. याचा अर्थ जर तुम्ही वीस वर्षांपूर्वी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.53 कोटी झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks of Kotak Mahindra Bank share price return on investment on 25 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x