22 November 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Nykaa Share Price | नायका शेअर्सची किंमत 57 टक्क्याने स्वस्त झाली, या स्वस्त झालेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी का?

Nykaa Share price

Nykaa Share Price| FSN E-Commerce Ventures Ltd ही ब्यूटी अँड वेलनेस ब्रँड कंपनी Nykaa ची मूळ पॅरेंट कंपनी आहे. आज या स्टॉकमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. हा शेअर आज 1108 रुपयांच्या नवीन विक्रमी नीचांकी किंमत पातळीवर पडला आहे. हा स्टॉक आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत सध्या 1125 रुपये किमतीवर खाली पडला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 1144 रुपये किमतीवर बंद झाला होता. 2022 या चालू वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 48 टक्के आणि गेल्या 1 वर्षात 50 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून सुमारे 57 टक्के पडला आहे. मागील वर्षी Nykaa कंपनीच्या शेअरने स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती, त्यानंतर हा शेअर आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आला आहे. अलिकडच्या काळात या स्टॉकमध्ये घसरणीचे मुख्य कारण काय? चला तर मग जाणून घेऊ

गुंतवणूकदारांसाठी सल्ला :
Nykaa मधील दीर्घकालीन गुंतवणूकदार पुढील महिन्याच्या 10 तारखेनंतर मोठ्या प्रमाणत विक्री करू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीच्या अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आला होता. स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर काही दिवसांत स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण सुरू झाली आणि स्टॉक आता इश्यू किमतीच्याही खाली ट्रेड करत आहे. लॉक-इन कालावधी संपल्यानंतर कंपनीचे अँकर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणत या शेअर मधून बाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ट्रिगरमुळे शेअरमध्ये घसरण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी असाच ट्रेंड झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्येही दिसून आला होता, अँकर गुंतवणूकदारांनी लॉक-इन पूर्ण झाल्यावर मोठया प्रमाणत विक्री केली होती.

IPO मध्ये केली होती जोरदार एन्ट्री :
Nykaa कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर 10 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचा स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक वाढीसह 2001 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. IPO लिस्टिंगच्या दिवशी हा शेअर 96 टक्क्यांच्या वाढीसह 2207 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच लिस्टिंगच्या दिवशी या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. त्यावेळी कंपनीच्या प्रोमोटर फाल्गुनी नायर प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यांची संपत्तीही IPO नंतर अनेक पटींनी वाढली होती. या कंपनीच्या शेअरने 2574 रुपये किमतीचा उच्चांकही स्पर्श केला होता. पण त्यानंतर स्टॉक IPO किंमतीपेक्षा 57 टक्क्यांनी खाली घसरून 1108 रुपयांवर आला आहे.

तज्ञांनी दिलेला सल्ला :
ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात Nykaa कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलने या स्टॉकवर 1780 रुपयांची लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, Nykaa चा मार्केट शेअर हळूहळू वाढत असून, Nykaa BPC वरचढ दिसून येत आहे. Nykaa कंपनीला सुपरस्टोअर व्यवसायात.नियमित कालावधीत गुंतवणूक वाढवावी लागेल. कंपनीचा महसूल आणि प्रॉफिट मार्जिन पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share price return on investment and end of Lock in period effect on stock price on 27 October 2022.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x