22 November 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | हा शेअर पैसाच पैसा देतोय, गुंतवणूक 4 पट वाढले, आता शेअर्स 12% स्वस्त मिळतोय, खरेदी करावा?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव असतानाही आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपनी अॅबॉट इंडियाचे शेअर्स वाढताना दिसत आहेत. 25 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 0.57 टक्के वाढीसह 18,462.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दुसरीकडे, दीर्घकालीन परतावा पाहिल्यास, या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. अॅबॉट इंडियाने केवळ 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 64 पट अधिक वाढवले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीचे बाजार भांडवल 4 टक्क्यांनी घसरले असून मागील एका महिन्यात कंपनीचे बाजार भांडवल पुन्हा 5 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 39,232.37 कोटी रुपये आहे.

गुंतवणूकदारांनी कमावला मजबूत परतावा :
मागील 20 वर्षांत अॅबॉट इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 64 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. 18 ऑक्टोबर 2002 रोजी या कंपनीचे शेअर्स 289.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात वाढ होऊन स्टॉक आता 18,452.05 रुपयेवर आला आहे. अशाप्रकारे गेल्या 20 वर्षांत अॅबॉट इंडिया कंपनीचे शेअर्स 6263.87 टक्क्यांनी वधारले आहेत.

शेअरची किंमत आणि परतावा :
7 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 12 टक्के डिस्काउंटवर मिळत आहेत. या वर्षी अॅबॉट इंडिया कंपनीच्या शेअर्सने 15525 रुपये ही आपली 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी किंमत स्पर्श केली आहे. नंतर या शेअर्समध्ये पुन्हा खरेदीचा कल वाढला आणि स्टॉक मजबूत तेजीत आला. गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक सुमारे 26 टक्क्यांच्या वाढीसह 20895 रुपयांवर पोहचला होता. स्टॉकमध्ये पुन्हा एकदा थोडी कमजोरी दिसून येत असून, सध्या शेअर 12 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
BSE निर्देशांकावर उपलब्ध डेटानुसार, चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत, Abbott India कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट दिसून आली होती, मात्र कंपनीच्या महसुलात वाढ दिसून आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 211.41 कोटी रुपयांवरून 205.64 कोटी रुपयांवर आला होता. त्याच वेळी, याच कालावधीत कंपनीचा महसूल 1,255.02 कोटी रुपयांवरून 1,304.37 कोटी रुपये वाढला.

कंपनीबद्दल थोडक्यात :
एबॉट इंडिया कंपनीचा मुख्य व्यवसाय न्यूट्रीशनल प्रोडक्ट्स, डायग्नोस्टिक टूल्स, ब्रांडेड जेनेरिक औषधे, डाइबिटीज व वस्कुलर डिवाइसेज तयार करण्याचा आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार एबॉट इंडिया कंपनी ही अॅबॉटच्या जागतिक फार्मा व्यवसायाची भारतीय शाखा असून अॅबॉट लॅबोरेटरीजची उपकंपनी म्हणून ओळखली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Abbott India share price return on investment on 27 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x