25 November 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
x

My EPF Money | प्रतिक्षा आता संपणार, तुमच्या ईपीएफ खात्यात लगेचच जमा होणार व्याजाची रक्कम

My EPF Money

My EPF Money | भविष्य निर्वाह निधी खाते धारकांसाठी एक खुशखबर आहे. शासनाने या सर्व खातेदाकांसाठी एक घोषणा केली आहे. यामुळे तुमचा बॅंक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधी खाते दारकांना आता त्यांच्या व्याजाचे पैसे लगेचच मिळणार आहेत. सरकार त्यांच्या खात्यात थेट व्याजाची रक्कम जमा करत आहे. यासाठी कामे देखील सुरू झाली आहेत. मात्र व्याजाची रक्कम कोणत्या तारखेपर्यंत पुर्ण देण्यास सुरूवात होईल याची तारिख अजून जाहिर झालेली नाही. गेल्या वर्षी या खातेदारकांना ८.१ टक्के दराने व्याज दिले आहे. अशात EPF चे खाते असलेल्यांचे व्याजाचे आकडे नेमके कसे ठरतात हे तुम्हाला माहित आहे का?

नेमके किती पैसे मिळणार
भविष्य निर्वाह निधी अर्थातच EPF खातेदारकांच्या व्याजाचा दर सरकारने निश्चित केला आहे. यात तुम्हाला साल २०२१-२२ साठी ८.१ टक्क्याने व्याज मिळणार आहे. व्याजाच्या या दरावर शिक्का मोर्तब झाला आहे. त्यामुळे पीएफ खातेदाराला किती व्याज मिळणार हे ८.१ टक्क्यांनुसार खात्यात जमा असलेल्या रकमेवरून समजेल. उदाहरणामार्फत समजुन घ्यायचे झाल्यास तुमच्या खात्यात १ लाख रुपये असतील ८.१ टक्के दराने एका वर्षात तुम्हाला व्याजाचे ८ हजार १०० रुपये दिले जातील.

पीएफ खात्याचा बॅलेन्स कसा तपासावा
* यासाठी तुम्हाला EPFO च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
* त्यानंतर आमच्या सेवा आणि कर्मचा-यांसाठी हे पर्याय निवडा.
* नंतर UAN आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
* पुढे पिएफ खाते उघडा त्यात तुम्हाला तुमचा बॅलेन्स किती आहे ते समजेल.
* तसेच EPFOHO UAN ENG फोनमध्ये टाइप करून 7738299899 या क्रमांकावर मॅसेज करा.
* यात पुन्हा रिप्लाय येईल त्यात तुमची शिल्लक दिसेल.

EPF चे पैसे इथे गुंतवा
या खात्यात जमा असलेली रक्कम अनेक ठिकाणी गुंतवता येते. याला EPFO द्वारे मंजूरी देण्यात आली आहे. यात तुम्हाला उत्तम परतावा व्याज मिळते. कर्ज पर्यायात तुम्हाला ८५ टक्के गुंतवणूक करता येते. तसेच उर्वरीत १५ टक्के रक्कम EPF मध्येच ठेवली जाते. यासाठी सरकारी रोख आणि बॉंड्स दिले जातात. यातील व्याजाचा दर तुमच्या इक्विटी आणि कर्ज यावर आधिरीत असतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : My EPF Money The wait is over now, the interest amount will be credited to your PF account immediately 28 October 2022.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x