25 November 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
x

Multibagger Stocks | फक्त 7 रुपयाच्या शेअरने संपत्ती 125 पटीने वाढवली, 80 हजारावर तब्बल 1.25 कोटी परतावा, स्टॉक डिटेल

Multibagger Stock

Multibagger Stocks | खाजगी क्षेत्रातील प्रसिद्ध Axis Bank चे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये कमालीचे प्रदर्शन करत आहेत. या बँकेच्या शेअर्सनी दीर्घ मुदतीत आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून देऊन मालामाल केले आहे. काही लोक तर फक्त 80 हजार रुपयांची अल्प गुंतवणुक करून करोडपती झाले आहेत. 2022-23 या चालू आर्थिक वर्षच्या दुसर्‍या तिमाहीत या बँकेचे निकाल जबरदस्त आले आहेत. 24 ऑक्टोबर 2022 रोजी Axis बँकेच्या शेअर्स सर्वकालीन उच्चांक किंमत गाठली होती.

अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये आता कमालीची तेजी आली असून शेअर्स सर्वकालीन उच्च किमतीच्या जवळ आले आहेत. अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये अजूनही कल अपट्रेंडच्या दिशेने दिसून येत आहे. सध्याच्या किमतीवर हे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला पुढील काळात 27 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. BSE निर्देशांकावर 27 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजार उघडल्यानंतर अॅक्सिस बँकेचे शेअर्स 905.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

खूप कमी कालावधीत अॅक्सिस बँकेच्या शेअर्स लोकांना उत्कृष्ट नफा कमावून दिला आहे. या महिन्यात आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 23 टक्के परतावा कमावला आहे. दुसरीकडे, दीर्घकालीन परतावा पाहिल्यास, अॅक्सिस बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 25 ऑक्टोबर 2002 रोजी Axis बँकेचे शेअर्स फक्त 7.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हे शेअर्स सध्या 905.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच जी तुम्ही अॅक्सिस बँकेच्या शेअर मध्ये फक्त 80 हजार रुपये लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 125 पटीने वाढून 1.25 कोटी रुपये झाले असते.

दुसऱ्या तिमाहीत जबरदस्त नफा :
अॅक्सिस बँकेने 20 ऑक्टोबर 2022 रोजी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले होते. या काळात बँकेचा निव्वळ नफा अपेक्षेपेक्षा खूप अधिक वाढला आहे. Axis बँकेचा नफा वार्षिक आधारावर 70 टक्के आणि तिमाही आधारावर 29 टक्क्यांनी वाढून 5329.77 कोटीं रुपये झाला आहे. त्याच वेळी, या कालावधीत बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात देखील वार्षिक 31 टक्के वाढ झाली असून उत्पन्न 10,360.3 कोटी रुपये झाले आहे. Axis बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 3.39 टक्के होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 0.57 टक्क्यांनी जास्त होते.

मॉर्गन स्टॅनलीचा अंदाज :
मॉर्गन स्टॅनलीने ऍक्सिस बँकेच्या शेअर्ससाठी वाढीव लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. अमेरिकेतील जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने Axis बँकेचे ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवली असून त्याची लक्ष्य किंमत 1150 रुपये निश्चित केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने पुढील सहामाहीत या बँकेच्या व्यवसायात तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी, सध्याच्या किमतीत गुंतवणूक केल्यास पुढील काळात हा स्टॉक 27 टक्के नफा देईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Goldman Sachs चा सल्ला :
Goldman Sachs ने Axis बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Goldman Sachs ही अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी असून त्यांनी Axis बँकेसाठी 1053 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या शेअरच्या किंमतीपेक्षा 17 टक्के अधिक आहे. Goldman Sachs च्या अंदाजानुसार अॅक्सिस बँकेच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणत वाढ होऊ शकते.

गुंतवणुकीची चांगली संधी :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही Axis बँकेसाठी खूप फायदा मिळवून देणारी ठरली आहे. या कालावधीत Axis बँकेने जबरदस्त नफा कमावला असून बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांनी वधारले आहेत. या शेअर्सनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर थोडी प्रॉफिट बुकींग दिसून आली होती, मात्र स्टॉक पुन्हा एकदा तेजीत आला आहे. शेअर बाजार तज्ञ या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी मानतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Axis Bank Share price return on investment on 28 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x