22 November 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

PPF Scheme Money | तुम्ही पीपीएफ गुंतवणूक करता? पीपीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर हे नियम जाणून घ्या

PPF Scheme

PPF Scheme Money  | पीपीएफ खात्यात म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर फायदा मिळतो. यात केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी फायद्याची असते. तसेच यात गुंतवणूक केल्याने तुम्हाला कर भरण्यापासूनही सुटका मिळते. ही एक सुरक्षित आणि जास्त परतावा मिळवून देणारी गुंतवणूक आहे.

पीपीएफ खाते उघडण्यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करावे लागते. यात तुम्ही भारताचे नागरिक असाल तरच पिपिएफ खाते उघडू शकता. तसेच एक व्यक्ती त्याच्या नावाने एकच पीपीएफ खाते खोलू शकतो. एका पेक्षा जास्ती खाती कोणत्याही व्यक्तीला खोलता येत नाहीत. यावर तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच आला असेल की, आमचे एका पेक्षा जास्त बॅंकांमध्ये खाती आहेत मग पीपीएफ खाते एकच का? तर ही देन्हीही वेगवेगळी खाती आहेत. जेव्हा तुम्ही बॅंकेत खाते खोलता तेव्हा ते बचत किंवा करंट खाते असते.

यात तुमचे पैसे तुम्ही ठेवू शकता आणि इतरांना पाठवू शकता. मात्र पीपीएफ खाते या उलट आहे. हे खाते गुंतवणूकीसाठी आहे. यात दर महा तुमच्या खात्यातील काही रक्कम त्यात जमा केली जाते. त्याचा कालावधी निश्चीत केलेला असतो. त्यामुळे एका पेक्षा जास्त ठिकाणी हे खाते खोलता येत नाही. पीपीएफ दिर्घकाळाच्या गुंतवणूकीचा विचार करून उघडतात.

पीपीएफ खाते उघडताना तुम्हाला भारताचे नागरिक असण्याची अट आहे. मात्र वयोमर्यादेची नाही. कोणत्याही वयात तुम्ही हे खाते उघडू शकता. तसेच यात तुमच्या लहान मुलांच्या नावे देखील गुंतवणूक करता येते. अनेक पालक आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी त्यांच्या नावाचे पीपीएफ खाते खोलतात.

हे खाते प्रत्येक स्थरातील व्यक्तीच्या फायद्याचे आहे. यात तुम्हाला फक्त १०० रुपयांच्या गुंतवणूकीपासून खाते खोलता येते. यात कमाल एका वर्षात तुम्ही १ लाख ५० हजार रुपये जमा करू शकता. तसेच किमान वर्षाला ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. यावर कर सवलत देखील जाते.

मात्र कमाल मर्यादा ओलांडी तर त्यावर कर आकारला जातो. १.५ लाख ही कमाल मर्यादा आहे. दीड लाख गुंतवणूकीची ही मर्यादा सर्वांसाठी आहे. यात तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने खाते खोलत असाल तरी देखील हा नीयम तुम्हाला ही लागू आहे. अल्पवयीन मुलांच्या खात्यात देखील दीड लाखांहून अधीक रक्कम आली तर त्यावर कर आकारला जातो. मुलांच्या नावाने हे खाते खोलताना पालकांचा केवायसी, मुलाचे जन्मपत्र, दोन पासपोर्ट साइज फोटो द्यावे लागतात. जेव्हा तुम्ही स्वत: साठी हे खाते खोलता तेव्हा तुमच्याकडे राशन कार्ड, आधार कार्ड, फोटो, स्वाक्षरी असेले झेरॉक्स ही सर्व कागदपत्रे लागतात.

प्रत्येक खातेदारकाला त्याच्या अडचणीच्य वेळेत खात्यातून रक्कम काढण्याची सवलत दिली आहे. मात्र याचे नियम फार कठीण आहेत. तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. ही एक दिर्घ कालीन गुंतवणूक आहे. यात व्याज देखील योग्य दरात दिले जाते. सरकारच्या या योजनेत ते व्याज आणि इतर दरात बदल करू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PPF Scheme Money Know these rules if you are withdrawing money from PPF account 28 October 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x