19 April 2025 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Loan on Pan Card | पॅन कार्ड झाले बहूउपयोगी, आता पॅन कार्डवर सुध्दा मिळणार कर्ज, प्रक्रिया जाणून घ्या

Loan on Pan Card

Loan on Pan Card | भारतातल्या प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. पॅन कार्डवर तुमची सर्व वित्तीय माहिती दिलेली असते. या माहितीच्या अधारे तुमचे आर्थिक व्यवहार समजले जातात. पॅन कार्डवर जो १० अंकी क्रमांक असतो त्यात ही सर्व माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे बॅंकेतून कर्ज घेताना पॅन कार्ड आधी मागितले जाते. त्याशिवाय कोणतीच बॅंक कर्ज देत नाही. अशात बॅंकेतून कर्ज मिळवण्याची प्रोसेस फार मोठी आणि वेळखाउ असते.

जेव्हा अर्जंट कोणत्या कामासाठी अथवा अडचणीत पैसे हवे असतात तेव्हा बॅंकेतून लगेचच कर्ज मिळवता येत नाही. अशात काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. तर तुम्हाला माहित आहे का तुमच्याकडे असलेले पॅन कार्ड फक्त तुमची आर्थिक माहिती ठेवत नाही तर वेळ पडल्यावर तुम्हाला कर्ज देखील देते. ते कसे हेच या बातमीतून जाणून घेऊ.

असे मिळते कर्ज
पॅन कार्ड मार्फत तुम्ही कर्ज मळवत असाल तरी पैसे तुम्हाला तुमच्या बॅंकेतूनच दिले जातात. मात्र थेट बॅंकेतून कर्ज घेताना लागणा-या प्रोसेस पेक्षा पॅन कार्डची पध्दत सोपी आहे. त्यामुळे तुम्ही हा पर्याय निवडू शकता. यात तुम्हाला काही दस्ताएवज सादर करावे लागतात. त्यावर तुम्हाला कमाल ५०,००० रुपयांचे कर्ज मिळवता येते. हे कर्ज देताना NBFC मार्फत तुमचा सीबील स्कोर तपासला जातो. सीबील स्कोर चांगला असेल तरच कर्ज दिले जाते.

कोणत्याही हमी शिवाय मिळते कर्ज
जेव्हा बॅंक कर्ज देत असते तेव्हा आपल्यकडून वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या जातात. तसेच बॅंकेला आपली वस्तू हमी म्हणून द्यावी लागते. मात्र पॅन कार्डवरील कर्जाला कोणत्याही हमीची आवश्यकता नसते. हे तुमचे वैयक्तीक कर्ज असते. त्यामुळे त्यावर व्याजाचा दर देखील जास्त असतो. अशात कोणतीही हमी नसल्याने बॅंका पॅन कार्ड कर्जासाठी कमाल ५० हजार रुपयांचेच कर्ज देतात.

ही कागदपत्रे आवश्यक
पॅन कार्ड कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला भरमाठ कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. या साठी सर्वात महत्वाचा क्रेडिट स्कोर आहे. तो ठिक असेल तरच कर्ज मिळते. यावेळी तुमची नोकरी, तुम्ही त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहात का. हे सर्व तपासले जाते. त्यामुळे कामाचे अथवा दोन वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवसायाचे सर्व तपशील द्यावे लागतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Loan on Pan Card Loan will also be available on PAN code 28 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Loan on Pan Card(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या