Multibagger Stocks | संयम पाळा पैसा वाढवा, या मल्टीबॅगर शेअरने 3 वर्षात पैसा 4 पटीने वाढवला, हा स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | Avro India Limited कंपनीचा IPO हा गुंतवणूकदारांना मोठा परतावा कमावून देणारा IPO ठरला आहे. Avro India कंपनीचा IPO 2018 मध्ये NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाला,आणि तेव्हापासून दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 150 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे पूर्वीचे नाव एव्हॉन मोल्डप्लास्ट लिमिटेड असे होते. नंतर या कंपनीने आपले नाव बदलून Avro India Limited असे केले. IPO लिस्टिंग मध्ये Avro India कंपनीचे शेअर्स जुलै 2018 मध्ये 52 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
लिस्टिंग किंमत :
Avro India कंपनीचा स्टॉक जुलै 2018 मध्ये NSE SME एक्सचेंजवर 52 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला होता, आणि त्याच दिवशी स्टॉक 51.65 रुपये किमतीवर बंद झाला. स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी एक वेळ 49.50 रुपयांवर ही पोहचला होता. मात्र, Avro India कंपनीची शेअर बाजारात एंट्री अपेक्षेप्रमाणे नव्हती. परंतु, सूचीबद्ध झाल्यानंतर हे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून देत आहे. या कंपनीच्या शेअरने दरम्यान 136.95 रुपये हा विक्रमी किंमत उच्चांक ही गाठला होता. सूचीबद्ध झाल्यानंतर या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 2.50 पट अधिक वाढवले आहेत.
3 वर्षात दिला 450 टक्के परतावा :
मे 2019 मध्ये सूचीबद्ध झाल्यावर हा स्टॉक त्याच्या लिस्टिंग किंमतीवरून 50 टक्क्यांनी घसरला आणि 25.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर तुम्ही मे 2019 मध्ये या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले असते, तर आता तुम्हाला या स्टॉकमधून 450 टक्के परतावा मिळाला असता. 2022 मध्ये, Avro india कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के नफा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे, मागील सहा महिन्यांत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 31.55 टक्के परतावा लावून दिला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 2.5 टक्के वर गेला आहे. Avro India कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 136.95 रुपये आहे, आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 74.65 रुपये होती. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 121.30 कोटी आहे.
4 वर्षात पैसे वाढले दुप्पट :
जर तुम्ही चार वर्षांपूर्वी Avro India कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य वाढून 232,115 रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुम्हाला 1 लाख रुपयांवर 467,829 रुपये परतावा मिळाला असता. Avro India कंपनीचे शेअर्स तीन वर्षांपूर्वी 25.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 120.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Avro India share price return on investment on 30 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल