26 November 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 10 कोटी रुपये परतावा हवा असल्यास किती मासिक SIP करावी लागेल, फायद्याचे बेसिक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची
x

EPF Pension Money | पगारदारांनो! खासगी नोकरीत 10 वर्ष पूर्ण करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन, जाणून घ्या काय नियम आहे

EPF Pension Money

EPF Pension Money | जर तुम्ही खासगी नोकरी केली आणि नोकरीची 10 वर्षे पूर्ण केली असतील तर तुम्हालाही पेन्शन मिळण्याचा हक्क मिळेल. ईपीएफओच्या नियमांनुसार, 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेला कोणताही कर्मचारी नोकरी पूर्ण केल्यानंतर पेन्शनसाठी पात्र ठरतो. पण या योजनेचा लाभ हा एक अट पूर्ण करणारा कर्मचारीच घेऊ शकतो. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगाराचा मोठा हिस्सा प्रॉव्हिडंट फंडात जातो. दर महिन्याला हा भाग पगारातून कापून कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा केला जातो.

ईपीएफओचे नियम
‘ईपीएफओ’च्या नियमांनुसार, कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या आणि डीएच्या १२ टक्के रक्कम दरमहा पीएफ खात्यात जाते. त्यापैकी कर्मचाऱ्याच्या पगारातून कापलेला संपूर्ण भाग ईपीएफकडे जातो, तर ८.३३% एम्प्लॉयर कंपनी एम्प्लॉइज पेन्शन स्कीम (ईपीएस) आणि ३.६७% हिस्सा दरमहा ईपीएफ योगदानाकडे जातो.

10 वर्षांच्या सेवेनंतर पेन्शन मिळण्याचा हक्क
अशा परिस्थितीत ईपीएफओच्या नियमानुसार 10 वर्ष खासगी कंपनीत काम केल्यानंतर कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरतो. यामध्ये कर्मचाऱ्याकडून एकच अट असते की, नोकरीच्या कार्यकाळातील 10 वर्षे पूर्ण करावीत. ९ वर्षे ६ महिन्यांचा नोकरी कालावधीही १० वर्षे इतकाच मोजला जातो. पण नोकरीचा कालावधी 9 वर्षांपेक्षा कमी असेल तर तो 9 वर्ष म्हणून गणला जाईल, हे लक्षात ठेवा.

एकच यूएएन नंबर असावा, तरच मिळणार पेन्शन
‘ईपीएफओ’च्या मते, १० वर्षांच्या दरम्यानच्या सर्व नोकऱ्या जोडून नोकरीचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना पेन्शन मिळण्याचा हक्क असेल. पण कर्मचाऱ्याला आपला यूएएन नंबर बदलावा लागणार नाही. म्हणजेच एकूण १० वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत एकच यूएएन असावा.

याचे कारण म्हणजे नोकरी बदलूनही यूएएन तसेच राहिले आणि पीएफ खात्यात जमा झालेले संपूर्ण पैसे याच यूएएनमध्ये दिसतील. दोन नोकऱ्यांमध्ये काही काळाचे अंतर असेल तर ते काढून कार्यकाळ एक मानला जातो. म्हणजे आधीची नोकरी आणि नवी नोकरी यातलं अंतर दूर होऊन त्यात नव्या नोकरीत भर पडते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EPF Pension Money after completion on 10 years in private company check details 05 April 2023.

हॅशटॅग्स

#EPF Pension Money(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x