22 November 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

SIP Calculator | म्युचुअल फंड SIP मार्फत दररोज फक्त 17 रुपये गुंतवून करोडोत परतावा मिळवू शकता, बात पैशाची आहे

SIP Calculator

SIP Calculator | जर तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी कोणतीही योजना आखली नसेल, तर लवकर आर्थिक नियोजन करा, आणि गुंतवणूक सुरू करा. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तुम्ही म्युचुअल फंड तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला म्युचुअल फंडबद्दल काही खास माहिती देणार आहोत, जी तुम्हाला गुंतवणूक करताना फायदेशीर ठरू शकते. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते.

छोट्या गुंतवणुकीतून मोठा परतावा :
म्युचुअल फंड योजनेत दर महिन्याला तुम्ही छोटी गुंतवणूक करून मोठा परतावा कमवू शकता. छोट्या गुंतवणुकीने म्युचुअल फंड मधून मोठा परतावा कमावता येतो, कसा? चला जाणून घेऊ. म्युचुअल फंड मध्ये तुम्हाला जास्त रक्कम गुंतवणूक करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला दरमहा फक्त 500 रुपये जमा करायचे आहेत. जर तुम्ही दररोज किमान 17 रुपये बचत करून दर महिन्याला म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर, दीर्घकाळात तुम्ही अप्रतिम परतावा कमवू शकता.

500 रुपये SIP वर परतावा :
तुम्ही सुरुवातीला म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. दर महिना 500 रुपये SIP मध्ये जमा करून तुम्ही करोडो रुपयांचा परतावा कमवू शकता. 500 रुपये जमा करून 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवू शकतो हे जाणून घेऊ. तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये रोज 17 रुपये म्हणजेच दर महिना 500 रुपये जमा करावे लागतील. मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंडांनी 20 टक्के व त्याहूनही अधिक परतावा मिळवून दिला आहे.

15 ते 20 टक्के परतावा कमवा :
म्युचुअल फंड SIP मधून भरघोस परतावा कमावण्यासाठी तुम्हाला दररोज 17 रुपये म्हणजेच प्रती महिना 500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम 20 वर्षांसाठी नियमित जमा करून तुम्ही वीस वर्षात 1.2 लाख रुपये गुंतवणूक कराल. 20 वर्षांमध्ये, वार्षिक सरासरी 15 टक्के दराने परताव्यावर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख 8 हजार रुपये होईल. जर तुम्हाला 20 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.80 लाख रुपये होईल.

30 वर्षांत करोडपती व्हा :
जर तुम्ही पुढील 30 वर्षांसाठी दरमहा 500 रुपये SIP मध्ये नियमित गुंतवले, तर या काळात तुमची एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये होईल. आता तुम्हाला यावर 30 वर्षांसाठी 20 टक्के सराररी वार्षिक परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.16 कोटी रुपये होईल. गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. यामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवणूक करण्याचे अप्रतिम लाभ मिळतात. हेच कारण आहे की छोटी रक्कम गुंतवणुक करून तुम्ही सहज मोठा परतावा कमवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SIP Calculator for investment in Mutual fund SIP for long term to earn huge returns on 31 October 2022

हॅशटॅग्स

#SIP Calculator(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x