23 November 2024 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

फडणवीसांना फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉनमधील फरकच माहिती नाही, आदित्य ठाकरेंनी पुराव्यानिशी एक्सपोज केलं

Aaditya Thackeray

DCM Devendra Fadnavis | विरोधक हे फेक नेरेटीव्ह पसरवत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक प्रकल्प हे राज्याबाहेर गेले. त्यातलाच प्रकल्प म्हणजे टाटा एअरबस प्रकल्प आहे. राज्यातील वातावरण गुंतवणुकीसाठी योग्य नसल्याचे गुंतवणूकदार यांचे म्हणणे होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना केला आहे. विरोधक त्यांच्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडत आहेत असे देखील फडणवीस म्हणाले.

राज्यातील अनेक प्रकल्प हे बाहेर गेल्याने विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी राज्यशासनावर टीकेची झोड उठवली आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, फॉक्सकॉन हा प्रकल्प आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं की फॉक्सकॉन राज्यात येणार नाही. हीच बाब टाटा एअरबसच्या बाबतीत हीच गोष्ट लागू आहे. काही लोकांनी आमच्या सरकारचा बदनामी करण्याचा घाट घातला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गैरप्रकार झाले आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक उद्योग हे राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक नाहीत. मात्र, आम्ही सत्तेत आल्यावर तब्बल २५ हजार कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत असे देखील फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दावे पुराव्यानिशी खोडून काढताना आदित्य ठाकरेंच्या प्रतिउत्तरात मात्र देवेंद्र फडणवीस यांचं अज्ञान समोर आल्याचं पाहायला मिळालं. तसेच तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विधानाच्या संबंधित जुनी बातमी दाखवताना मूळ बातमी काय आहे हे न पाहता फडणवीसांनी त्या प्रिंटची केवळ हेडलाईन दाखवत संभ्रम तर निर्माण केला, पण त्यांनी फॉक्सकॉन संबंधित दुसराच संदर्भ दिला, ज्याचा मूळ फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पाशी कोणताही संबंध नव्हता हे सस्पष्ट झालं.

भाजपचा सोशल मिडीयावरुन दावा करताना रायगमधील २० हजार कोटींची गुंतवणूक असलेला सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प युती सरकारच्या काळात आल्याचा दावा करण्यात आला.

त्यावर आदित्य ठाकरेंचं उत्तर आलं आणि फडणवीस तोंडघशी पडले. देवेंद्र फडणवीस आणि खोके सरकार सांगत आहेत की हा प्रकल्प त्यांनी आणला. पण MIDC च २३ मे २०२२ रोजीच ट्विट सांगत आहे की, दावोसमध्ये या प्रकल्पाचा करार झाला. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात झालेला आहे.

फॉक्सकॉन, सुभाष देसाईं आणि फडणवीस यांचा दावा
आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही हे उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री असलेले सुभाष देसाईच सांगितले होते, असा दावा केला. ते म्हणाले, जेव्हा हा प्रकल्प गेला तेव्हा अशी का भूमिका घेतली की प्रकल्प आमच्याच काळात गेला? पहिला फेक नेरेटिव्ह हाच तयार करण्यात आला.

अनेक ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलं आहे. यानंतर टाटा एअरबसवरून आम्हाला दोषी धरलं जातं आहे. २३ सप्टेंबर २०२१ ची बातमी आहे. यात गुजरातला प्रोजेक्ट जाणार असल्याचं म्हटलं आहे. एकाच पेपरचं नाही १४ फेब्रुवारी २०२२ ला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा बिझनेस वर्ल्डनेही हीच बातमी दिली आहे. संडे एक्स्प्रेसनेही अशीच बातमी दिली आहे.

फडणवीसांची पोलखोल – फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन दोन वेगळे प्रकल्प
त्यानंतर पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी देखील तीच बातमी पुन्हा दाखवली. ते म्हणाले, ही बातमी जर देवेंद्र फडणवीस यांनी वाचली असती तर त्यांना लक्षात आलं असतं की देसाई काय म्हणत आहेत? २०१६ ला जो मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम झाला त्यात यासंबंधीची बोलणी झाली होती. त्यावेळी फॉक्सकॉनचा हा MoU साईन झाला होता.

पण देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला प्रस्ताव हा तामिळनाडूत गेला आहे. फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन या दोन प्रकल्पांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीप साठी होता. मोबाईल फोनसाठी नव्हता. माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपया महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. फॉक्सकॉन कंपनी MoU साईन करून बसली पण त्यांनी ती जागा घेतलीच नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yuva Sena leader Aaditya Thackeray exposed DCM Devendra Fadnavis in PC check details 31 October 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x