25 November 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

Canara Bank Share Price | कॅनरा बॅकेच्या शेअरमध्ये पसरली हिरवळ, गुंतवणुकदार करत आहेत जोरदार खरेदी, स्टॉक खरेदी करावा?

Canara Bank Share Price

Canara Bank Share Price | 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कॅनरा बँकेने आपले निकाल जाहीर केले असून बँकेचा निव्वळ नफा 89 टक्क्यांनी वाढला आहे. कॅनरा बँकेने या तिमाहीत 2525 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. 2021-22 या मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत कॅनरा बँकेने 1333 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

Canara Bank Shares :
मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर कॅनरा बँकेचा स्टॉक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 297.35 रुपयांच्या आपल्या तीन वर्षांतील उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. सप्टेंबर तिमाहीच्या उत्कृष्ट निकालानंतर कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली होती. वास्तविक, कॅनरा बँक या राष्ट्रीयकृत सरकारी बँकेने जुलै ते सप्टेंबर या तिमाही कालावधीत अप्रतिम नफा कमावला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कॅनरा बँकेच्या निव्वळ नफ्यात 89 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली असून निव्वळ नफा एकूण 2525 कोटी रुपयांवर गेला आहे. 2021-22 या मागील आर्थिक वर्षाच्या तिमाही कालावधीत कॅनरा बँकेने 1333 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

बँकेच्या उत्पन्नात वाढ :
कॅनरा बँकेच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली असून, बँकेने 24932.19 कोटी रुपये कमावले आहे. हे उत्पन्न मागील वर्षीच्या या तिमाही कालावधीत बँकेने 21331.49 कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी कॅनरा बँकेचे NPA प्रमाण म्हणजे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्सचे प्रमाण एकूण 6.37 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. सप्टेंबर 2021 च्या अखेर पर्यंत कॅनरा बँकेचा NPA 8.42 टक्के पर्यंत आला होता. बँकेचा निव्वळ NPA 3.32 टक्क्यांवरून 2.19 टक्क्यां पर्यंत कमी झाला आहे.

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक :
ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले होते. कॅनरा बँकेच्या जुलै-सप्टेंबर 2022 च्या तिमाही निकालात जाहीर केलेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये 26,847,400 शेअर्स समाविष्ट आहेत. म्हणजेच कॅनरा बँकेत राकेश झुनझुनवाला यांचा 1.48 टक्के मालकी वाटा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Canara Bank Share Price has increased after declaring profitable Quarterly results 02 November 2022.

हॅशटॅग्स

#Canara Bank Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x