23 November 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार
x

Multibagger Stocks | फक्त 10 महिन्यांत 900 टक्केपेक्षा जास्त परतावा, प्लस बोनस शेअर्सही मिळणार, स्टॉक नेम नोट करा

Multibagger Stock

Multibagger Stocks | 2022 या वर्षात भारतीय स्टॉक मार्केटने वगुंतवणूकदारांना निराश केले आहे. असे असले तरी अनेक कंपन्यांनी या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावाही कमावून दिला आहे. अल्स्टोन टेक्सटाइल ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 900 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांना इतका मजबूत परतावा दिल्यानंतर ही कंपनी आता स्टॉक स्प्लिट सोबत बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 नोव्हेंबर 2022 रोजी नियोजित केली आहे.

शेअर्सचे विभाजन प्रमाण :
ही कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स दहा शेअर्समध्ये विभाजन करणार आहे. म्हणजेच स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये पर्यंत कमी होईल. त्याचबरोबर बोनस शेअरबाबत कंपनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता नियोजित केली आहे”. या कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, कंपनी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट बाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणार आहे.

शेअरची कामगिरी :
मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, या कंपनीचे शेअर 67 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 159.60 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच फक्त एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किमती 140 टक्क्यांनी वधारली आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया कंपनीचे शेअर 16 रुपयांवर ट्रेड करत होते, ते सध्या 159.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच फक्त 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किमत 900 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10 रुपये प्रति शेअर आहे. त्याच वेळी, कंपनीचे बाजार भांडवल 203 कोटी रुपये आहे. कंपनी सध्या फक्त BSE वर सूचीबद्ध आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Alstone textile India limited share price return on 03 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x