15 December 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

Mutual Funds | बँक किती वार्षिक व्याज देते? या म्युच्युअल फंड योजना 50 टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत, नोट करा यादी

Mutual funds

Mutual Funds | तुम्ही दीर्घकालीन आणि संयम असणारे गुंतवणूकदार असाल तर, तुमच्यासाठी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय असू शकतो. गुंतवणुक बाजारात स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 32 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. टॉप परफॉर्मर स्कीमने वार्षिक आधारावर 52 टक्के परतावा मिळवून दिला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दीर्घकालीन आणि संयमी गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला अल्प गुंतवणूक करून जास्त परतावा कमवायचा असेल असेल तर, या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जर गुंतवणुकीत जास्त जोखीम आणि कमी परतावा असेल आणि त्यात नियामक समस्या असतील तर, असे म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी टाळले पाहिजेत. उदाहरणार्थ, क्रिप्टोकरन्सी सारखे गुंतवणूक पर्याय. यामध्ये नियमनाचा अभाव असून जोखीम जास्त आहे.

SIP मध्ये मर्यादित जोखीम :
म्युच्युअल फंड योजना हे पूर्णपणे सरकारी नियामक संस्थाकडून नियंत्रित केले जातात. म्युचुअल फंड निश्चितपणे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत, परंतु किती जोखीम घ्यायची, आणि किती गुंतवणूक करायची हे पूर्णपणे गुंतवणूकदारावर अवलंबून असते. जर तुम्ही या योजनांमध्ये SIP पद्धतीने गुंतवणूक केली तर, त्यात जास्त जोखीम तर असेल मात्र उच्च परतावा ही कमावता येईल. विशेष म्हणजे SIP च्या मदतीने म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुमची जोखीमही काही अंशी कमी होईल. याशिवाय, एकरकमी गुंतवणूक केल्यावर भोगावे लागणार तोटे आणि जोखीम तुम्हाला सहन करावी लागणार नाही. म्युचुअल फंड बाजारात चढ-उतारांचा फारसा प्रभाव पडत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही म्युचुअल फंड SIP ही गुंतवणुकीची शिस्तबद्ध पद्धत मानली जाते.

टॉप 5 स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
3 वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर आम्ही तुमच्यासाठी काही स्मॉल कॅप म्युचुअल फंड निवडले आहेत. क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ परतावा देण्याच्या बाबतीत इतर म्युचुअल फंडाच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे. या म्युचुअल फंडने वार्षिक 52 टक्के CAGR परतावा दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंड प्लॅनने 40.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्यूचअल फंडाने 40 टक्केचा परतावा दिला आहे. तर निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने 35 टक्केचा परतावा आणि एडलवाईस स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के CAGR परतावा मिळवून दिला आहे.

5000 च्या SIP वर किती परतावा मिळेल? :
जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी Quant Small Cap Fund मध्ये दर महिन्याला 5000 रुपयाची SIP गुंतवणूक सुरू केली असती तर, सध्या तुम्हाला 3.5 लाखांपेक्षा जास्त निव्वळ परतावा मिळाला असता. फक्त तीन वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये झाली असती, आणि त्यावर तुम्हाला 3.51 लाख रुपये निव्वळ परतावा मिळाला असता. या हिशोबाने तुमच्या एकूण गुंतवणुकीवर मिळणारा परतावा 95 टक्के पेक्षा जास्त झाला असता. या योजनेची NAV सध्या 145 रुपये आहे. म्युचुअल फंडाचा आकार 2200 कोटींहून अधिक असून त्यात तुम्ही किमान 1000 रुपयांपासून SIP गुंतवणूक करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top Five Mutual funds for Investment and earning high returns in short term on 03 November 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x