23 November 2024 5:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Unemployment in India | भाजप सरकार 1000-2000 रोजगारांचे मार्केटिंग इव्हेन्ट का थाटतंय? देशातील बेरोजगारीचं सत्य समोर आलं

Unemployment in India

Unemployment In India | ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (सीएमआयई) मते, खरीप पिकांच्या हंगामानंतर ग्रामीण बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ऑक्टोबरमध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढून ७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबरमधील चार वर्षांतील नीचांकी ६.४३ टक्के होता. ग्रामीण बेरोजगारीचा दर सप्टेंबरमधील ५.८४ टक्क्यांवरून ८.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर शहरी बेरोजगारीचा दर मागील महिन्यातील ७.७ टक्क्यांवरून ७.२१ टक्क्यांपर्यंत आला आहे.

ऑक्टोबरमध्ये ग्रामीण रोजगारात घट
पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरलेली खरीप पिके सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पूर्वार्धाच्या दरम्यान काढणीला येतात, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ग्रामीण रोजगारात घट होते. हिवाळी पिकांच्या पेरणीला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होते. नोव्हेंबर 2021 मध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर गेल्या महिन्यातील 7.91 टक्क्यांवरून 6.41 टक्क्यांवर आला होता.

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात होऊ शकते नोकरभरती
दरम्यान, टीमलीज सर्व्हिसेसच्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत हायरिंग करण्याच्या विचारात आहेत, 57 टक्के नोकरदार या कालावधीत त्यांचे टॅलेंट पूल वाढविण्यास उत्सुक आहेत. परंतु ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक गोष्टी आर्थिक दृष्ट्या कठीण होऊन बसल्या आहेत. तसेच अनेक कंपन्यांमध्ये नोकर कपातीचा सपाटा सुरु झाला आहे.

ईपीएफओचे १.६९ दशलक्ष सदस्य जोडले
सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ऑगस्ट 2022 मध्ये जोडलेल्या एकूण 1.69 दशलक्ष सदस्यांपैकी सुमारे 0.99 दशलक्ष सदस्य प्रथमच ईपीएफओच्या कक्षेत आले आहेत. त्यापैकी सुमारे ५८.३२ टक्के लोक हे १८ ते २५ वयोगटातील होते. त्यातून कौटूंबिक आर्थिक अवस्था बिकट झाल्या असून त्यामुळे अत्यंत कमी वयात तरुण तरुणी मिळेल ती नोकरी करत असल्याचं आकडेवारी सांगते आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Unemployment in India October 2022 numbers published check details 04 November 2022.

हॅशटॅग्स

#Unemployment in India(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x