5 November 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Stock in Focus | बक्कळ पैसा मिळतोय, आता या दिग्गज गुंतवणूकदाराने हा शेअर खरेदी केला, स्टॉक नेम नोट करा

Hot Stocks

Stock in Focus | भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी FY2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत आपल्या पोर्टफोलिओमध्ये Elecon Engineering Company Ltd कंपनीचे आणखी शेअर्स जोडले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि स्टॉकची किंमत 400.65 रुपयांवर ट्रेड करत होता.

कंपनीमध्ये 1.94 टक्के वाटा :
सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत BSE निर्देशांकावर उपलब्ध नवीनतम शेअरहोल्डिंग डेटानुसार, भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडीया यांची Elecon Engineering Company Ltd कंपनीमध्ये 1.94 टक्के गुंतवणूक आहे. विजय केडीया यांच्याकडे Elecon Engineering Company Ltd कंपनीचे एकूण 21,75,000 इक्विटी शेअर्स होल्ड आहेत. या पूर्वी विजय केडिया यांच्याकडे Elecon Engineering Company चे 1.85 टक्के शेअर्स म्हणजे 20,75,000 पेक्षा जास्त शेअर्स होल्ड होते. आता त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
अल्कॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 120 टक्के पेक्षा जास्त मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेअरची किंमत 2022 मध्ये आतापर्यंत 90 टक्के पेक्षा अधिक वाढल्याची आपण पाहू शकतो.

कंपनीबद्दल थोडक्यात :
1951 साली अल्कॉन इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीची स्थापना झाली होती. ही कंपनी औद्योगिक गियर मोटर्स आणि रीड्यूसर, सामग्री हाताळणी उपकरणे, खाण उपकरणे, कास्टिंग प्रक्रिया इत्यादीं मशीन बनवण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. अल्कॉन इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी ही आशिया खंडातील मटेरियल हाताळणी उपकरणे आणि औद्योगिक गियर बनवणारी सर्वात मोठी कंपनी मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock in Focus of Elecon Engineering Company Ltd share price return on investment on 05 November 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x