15 November 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Credit Card Payment | हलक्यात घेऊ नका, तुम्ही पैसे खर्च केल्याचा मेसेज येईल, या टिप्स फॉलो करा, क्रेडिट कार्ड सुरक्षित करा

Credit Card Payment

Credit card Payment | क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला खूप सावढोणे व्यवहार करावे लागतात. कारण त्यांची फसवणूक होऊ शकते, ही फसवणूक टाळण्यासाठी लोकांनी सावध राहिले पाहिजे. जर क्रेडिट कार्ड वापरताना तुमच्याकडून एक चूक झाली तर फसवणूक करणारे लोक तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून कोणत्याही ओटीपी शिवाय, पैसे काढू शकतात. त्यामुळे तुम्ही काही सोप्या पद्धती आणि नियम फॉलो करून आपले क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवू शकता. या पद्धतीने तुमचे क्रेडिट कार्ड सुरक्षित राहील आणि तुमची फसवणूक होणार नाही. या गोष्टींची काळजी घेतली तर OTP सांगितल्या शिवाय, तुमच्या क्रेडिट कार्डवर कोणतेही व्यवहार पूर्ण होणार नाही.

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांकडून अनेक वेळा अशी तक्रार करण्यात येते की, क्रेडिट कार्डचा OTP न विचारता अकाउंट मधून पैसे झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर करताना खूप सावधपणाने व्यवहार करावे लागणार आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांची फसवणूक करणारे लोक हा संपूर्ण स्कॅम VPN च्या मदतीने करतात. तुमच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला आकर्षक अमिष दाखवले जातात. सर्वात जास्त फसवणूक तुम्हाला क्रेडिट कार्डवर दिल्या जाणाऱ्या कॅशबॅक ऑफरमध्ये होतात. कॅशबॅक ऑफर चे लालच देऊन तुम्हाला जर या ऑफरचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्हाला एक अॅप डाउनलोड करावा लागेलं, असे सांगितले जाते. आणि तुमच्या फसवणुकीची सुरुवात होते.

हे फ्रॉड मालवेअर App तुमच्या मोबाईलवर डाउनलोड झाल्यानंतर हॅकर्स VPN कनेक्ट करतात. ॲप मध्ये विशिष्ट ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्डची माहिती टाकण्यास सांगितले जाते. क्रेडिट कार्डची डिटेल टाकल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर ओटीपी येतो. तुमच्या क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्यासाठी हॅकर्सला हा ओटीपी विचारण्याची गरज पडत नाही. कारण, ते VPN कनेक्ट करून सहज तुमचा ओटीपी माहीत करू शकतात. व्हीपीएन कनेक्ट असल्याने तुम्हाला मेसेज किंवा क्रेडिट कार्ड संबंधी कोणतीही माहिती मिळत नाही. अशा काही तांत्रिक त्रुटींचा फायदा हे हॅकर्स घेतात आणि तुमची फसवणूक करतात.

त्यामुळे आपले क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी अनेक कंपन्या काही सुविधा देतात. समजा तुमच्या क्रेडिट कार्डचा चुकीने कुणी वापर केला असेल तर योग्य वेळी तक्रार केल्यास क्रेडिट कार्ड कंपनी तुमचे पैसे परत करते. पेमेंट करते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादा कॉल आला आणि ते तुम्हाला OTP विचारत असतील, किंवा एखादा ॲप डाऊनोड करायला सांगत असतील तर त्यांना कोणताही प्रतिसाद देवू नका. अनेक लोकांसोबत अशी फसवणूक झाली आहे, त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना सावध राहा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Precautions to Avoid Credit Card Payment fraud from Hackers on 05 November 2022.

हॅशटॅग्स

Credit card payment(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x