22 November 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सामान्य मतदार नव्हे, मुरजी पटेलांचे पदाधिकारी, कार्यकतें व त्यांचे कुटुंबीय नोटासाठी उतरलेले, सामान्य मतदार सेनेच्या मशालीकडे

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray

Andheri East By Poll Assembly Election Result | शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यामुळे मोठी वाताहात झाली होती. त्यातच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप व शिंदे गट आमनेसामने आले होते. पण, अंधेरीतील वारे पाहता भाजपने माघार घेतली. नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दणदणीत विजयाकडे वाटचाल केली आहे. ऋतुजा लटके यांनी विक्रमी आघाडी घेतली असून विजय निश्चित मानला जात आहे.

राज्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीत राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास आता स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत एकूण १३व्या फेरींचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, आता अंधेरी पूर्व येथील स्थानिक पातळीवरील भाजपच्या गोटातून मिळालेल्या वृत्तानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी भाजपचे मुरजी पटेल यांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केंद्रावर घेऊन गेले होते आणि तीच मतं नोटाला पडली आहेत असं वृत्त आहे. मात्र सामान्य लोकांनी भाजपच्या छुप्या कॅम्पेनकडे दुर्लक्ष करत मशालीचं बटण दाबलं अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सामान्य मतदार जितकं धनुष्यावर प्रेम करत होता तेवढच तो मशालीवर सुद्धा करत आहे हे सिद्ध झालं आहे. पोटनिवडणुकीत साधारणपणे मतदानाची खूप कमी टक्केवारी असते हा इतिहास राहिला नाही. मात्र अंधेरी पूर्व येथे जे एकूण मतदान झालं त्यातील ८० टक्क्याहून अधिक मतदान हे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मिळाली आहे.

तेराव्या फेरीअखेरची स्थिती
* ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 48,015 मतं
* बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स) – 1,151 मतं
* मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी) – 708 मतं
* नीना खेडेकर (अपक्ष) – 1,156 मतं
* फरहाना सिराज सय्यद (अपक्ष) – 859 मतं
* मिलिंद कांबळे (अपक्ष) – 499 मतं
* राजेश त्रिपाठी (अपक्ष) – 1,211 मतं
* नोटा – 9,547 मतं
* 13व्या फेरीअखेर एकूण मतं – 6,3146

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Uddhav Balasaheb Thackeray party candidate Rutuja Latke victory with majority check details 06 November 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena Uddhav Balasaheb Thackeray(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x