24 November 2024 5:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

VIDEO | मी असं बोललो नाही असं म्हणणाऱ्या सत्तारांचा हा व्हिडिओ पहा, नाव घेत अत्यंत घाणेरडे शब्द वापरले

Abdul Sattar

Minister Abdul Sattar | शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्यानं ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती. सुप्रिया सुळेंच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य उत्तर दिलंय. त्यामुळे सत्तार पुन्हा एकदा वादात सापडलेत.

शिवसेनेत झालेलं बंड आणि त्यानंतर घडलेलं सत्तांतर याचे पडसाद अजूनही राज्यात उमटताहेत. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० कोटी म्हणजे ५० खोके घेतल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार हा आरोप होतोय.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या’ अशी टीकाच सत्तार यांनी केली. सत्तार यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि सिल्लोड दौऱ्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना शिंदे आणि ठाकरे गटातील नेते तसेच इतरही पक्षांचे नेते पातळी सोडून बोलताहेत. राजकारणाचा घसरलेला हा पोत आणखी काय काय ऐकायला आणि पहायला लावणार आहे, असा प्रश्न महाराष्ट्राकडून विचारला जात आहे. ताजं कारण ठरलंय कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ. लोकशाही वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला. यावेळी सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवीगाळ केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO of agriculture minister Abdul Sattar statement against MP Supriya Sule check details 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Abdul Sattar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x