23 November 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

हर हर महादेव सिनेमा मी पाहिलेला नाही, त्यात काय वाद आहे माहित नाही, फडणवीसांनी वादापासून अंतर ठेवणं पसंत केलं

DCM Devendra Fadnavis

Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटातील अनेक प्रसंग आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या घटनांप्रमाणे नाहीत, अशी टीका अनेक संघटनांकडून करण्यात येतेय. विशेषतः बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील युद्धाचा एक प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आलाय. मुळात या दोहोंमध्ये युद्ध झालंच नव्हतं, असा संघटनांचा दावा आहे. मात्र चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या आक्षेपांना उत्तर दिलं आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी दिली आहे. ऐतिहासिक चित्रपटांनी प्रसंगांचं परीक्षण कऱण्यासाठी सेन्सॉर बोर्डावर इतिहासकारांचीही नेमणूक असते. त्यांनीही मान्यता दिल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होतो.

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं ?
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या राड्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हर हर महादेव सिनेमा मी पाहिलेला नाही. त्यात काय वाद आहे मला माहित नाही. कोणालाही विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने करावा. कोणाला सिनेमाबद्दल जर आक्षेप असतील तर त्यांनी सनदीशीर पद्धतीने मांडावे, पण अशा पद्धतीने कुणी थिएटरमध्ये घुसून लोकांना मारत असेल तर ते सहन केले जाणार नाही. कारवाई केली जाईल.

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातील लढाई – देशपांडे काय म्हणाले
या सगळ्या गोष्टींबद्दल आमचं सविस्तर निवेदन येणार आहे. हाच प्रश्न आम्हाला सेन्सॉर बोर्डाने विचारला होता. आपलं होतं काय की, शाळेत शिकवला जातो. शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती आलाय, याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. आपल्याला तेव्हढाच इतिहास वाटतो, पण आपण जेव्हा बखरींचा अभ्यास करतो. इतिहासकारांशी बोलतो. असे इतिहासकार ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत आणण्यासाठी. त्यातून आपल्याला काही संदर्भ मिळतात.”

उदाहरण द्यायचं तर केळुस्कर. १९०५-०६ मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ज्यात या घटनेचा जसाच्या तसा उल्लेख आहे, जे आम्ही आमच्या सिनेमात दाखवलंय. त्यांना सत्यशोधक म्हणायचे. त्यांनी ज्योतिबा फुलेंवर जे पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेतलीये. इतका त्या माणसाचा अभ्यास होता. पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला पुरावे मिळाले. हेच पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डाला दिलेत”, असं अभिजित देशपांडे यांनी सांगितलं. कोणता सीन पटला किंवा नाही पटला यावर वादविवाद होऊ शकतात. कुठली तथ्य पटली किंवा नाही पटली, तर त्यावरही चर्चा करा पण कोर्टात बोलू. पण चित्रपटगृहात जाऊन बोलणं चुकीचं आहे”, असं अभिजित देशपांडे म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis statement on Har Har Mahadev movie controversy check details 08 November 2022.

हॅशटॅग्स

#DCM Devendra Fadnavis(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x