21 November 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Mutual Funds | बँक एफडी? नाही या म्युचुअल फंड योजना वार्षिक 30 टक्के परतावा देतं आहेत, स्कीम नेम नोट करा

Mutual fund

Mutual Funds | जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल आणि तुम्हाला बंपर परतावा कमवायचा असेल तर सेक्टरल म्युचुअल फंड योजना तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय राहील. या सेक्टरल म्युचुअल फंडात गुंतवले जाणारे पैसे एकाच क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लावले जातात. उदाहरणार्थ, तुमचा पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान, बँकिंग, फार्मा, नैसर्गिक संसाधने यांसारख्या क्षेत्रात गुंतवला जातो. क्रेडेन्स वेल्थ अॅडव्हायझच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, जर एखादे क्षेत्र चांगली कामगिरी करत असेल, तर त्यात तुम्ही सेक्टरल म्युचुअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.

गुंतवणूकीची विभागणी :
क्षेत्रीय गुंतवणुकी अंतर्गत, कोणत्याही एका क्षेत्रात एकूण फंडाच्या 80 टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. उर्वरित 20 टक्के रक्कम कर्ज किंवा हायब्रिड सिक्युरिटीज फंडमध्ये गुंतवले जाते. आपले पोर्टफोलिओ विविधीकरण करण्यासाठी सेक्टरल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. मात्र, यामध्ये जोखीम खूप जास्त असते. अशा परिस्थितीत, प्रथम एक कोर पोर्टफोलिओ तयार करा आणि नंतर सेक्टरल फंड गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमच्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये मोठ्या, मध्यम आणि लहान कॅप्सचे गुंतवणूक समाविष्ट करू शकता. सेक्टरल फंडमधील गुंतवणुकीवर वेळेवर प्रवेश करणे आणि योग्य वेळी बाहेर पडणे खूप गरजेचे आहे, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते.

आयटी क्षेत्रातील फंडांचा सरासरी परतावा :
या क्षेत्रातील म्युचुअल फंडाचा परतावा उत्कृष्ट आहे, असे म्युचुअल फंड तज्ञ म्हणतात. आयटी क्षेत्राची कामगिरी मागील तीन वर्षांत सरासरी 30 टक्के वाढली असून, पाच वर्षांत 25 टक्के आणि गेल्या 7 वर्षांत 17 टक्केने वाढली आहे. म्युचुअल फंड तज्ञांनी आपल्या आहवालात ज्यां लोकांना टेक्नॉलॉजी सेक्टरल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी दोन फंड सुचवले आहेत. त्यांचे नाव टाटा डिजिटल आणि एबीएसएल डिजिटल इंडिया असे आहे.

टाटा डिजिटल इंडिया म्युचुअल फंड :
टाटा डिजिटल इंडिया म्युचुअल फंड हा एक आयटी फोकस्ड सेक्टरल फंड आहे ज्याने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 36 रुपये असून त्याचा निधीचा आकार 5888 कोटी रुपये आहे. मागील तीन वर्षांपूर्वी, जर तुम्ही या म्युचुअल फंडात 5000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर, तुम्हाला आता 2.56 लाख रुपये निव्वळ परतावा मिळाला असता. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये झाली असती, आणि त्यावर तुम्हाला 42 टक्के परतावा मिळाला असता.

ABSL डिजिटल इंडिया फंड :
ABSL डिजिटल इंडिया म्युचुअल फंड म्हणजेच आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 26 टक्क्यांच्या जवळपास परतावा कमावून दिला आहे. या फंडाचे एनएव्ही म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 128 रुपये असून या निधीचा आकार 3035 कोटी रुपये आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात 5000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुम्हाला सध्या एकूण 2.53 लाख रुपये परतावा मिळाला असता. तुमची यात गुंतवलेली एकूण रक्कम 1.8 लाख रुपये झाली असती, आणि तुम्हाला त्यावर 41 टक्के निव्वळ परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sectoral Mutual fund in Technology sector for investment and earning huge returns on 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x