IPO in Focus | गौतम अदानींची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये चर्चा, शेअरची प्राइज बँड पहा
IPO in Focus | Inox Green Energy Services Limited कंपनीचा IPO 11 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. INOX ग्रीन एनर्जी IPO 11 नोव्हेंबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या IPO मध्ये शेअर 61-65 रुपये प्रति शेअर या दराने जारी केले जातील.
740 कोटी उभारण्याचे लक्ष्य :
INOX एनर्जी कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 740 कोटी जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये 370 कोटी रुपयेचे फ्रेश शेअर्स जारी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तर उर्वरित 370 कोटी ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर बाजारातून उभारले जाणार आहे. शेअरचे दर्शनी मूल्य प्रत्येकी 10 रुपये आहे. या IPO मधून उभारलेली सर्व रक्कम कंपनी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांमध्ये लागणारे खरेच भागवण्यासाठी वापरणार आहे.
ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत :
आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होण्याच्या आधी ग्रे मार्केटमध्ये तेजीत प्रिमियम किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर मार्केट तज्ञाच्या मते, INOX ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 12 च्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केटमधील गुंतवणुकदारांना अशी अपेक्षा आहे की, आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनीचा आयपीओ 77 (65 + 12) रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. हे प्रमाण आयनॉक्सच्या इश्यू किमतीच्या 18.50 टक्के जास्त आहे.
गौतम अदानी यांची गुंतवणूक :
INOX ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी आयनॉक्स विंड या कंपनीची उपकंपनी असून ती गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू यासारख्या विकसित राज्यात आपला उद्योग व्यवसाय करते. आयनॉक्स ग्रीन एनर्जी ही कंपनी जीएफएल ग्रुपचा एक भाग आहे. आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीमध्ये सध्या आयनॉक्स विंडचा 93.84 टक्के मालकी वाटा आहे. अलीकडेच आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीने गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला आपल्या तीन स्पेशल युनिट्स मधील संपूर्ण इक्विटी हिस्सा विकला आहे. म्हणजेच गौतम अदानी यांनी INOX ग्रीन या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| INOX Green Energy services limited IPO in Focus of Gray Market investors on 10 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC