Multibagger Stock | मल्टीबॅगर अलर्ट, या शेअरने 300 टक्के परतावा दिला, तुम्ही स्टॉक खरेदी करून पैसा वेगाने वाढवणार?
Multibagger Stock | Greenpanel Industries Ltd ही एक S&P BSE SmallCap कंपनी असून या कंपनीने मागील दोन वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर 06 नोव्हेंबर 2020 रोजी 85.15 रुपयेवर ट्रेड करत होते, 08 नोव्हेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 381.55 रुपयेवर गेली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 348 टक्के वाढली आहे.
दरम्यान, S&P BSE SmallCap निर्देशांकात 92.48 टक्के वाढ पाहायला मिळाली असून, 06 नोव्हेंबर 2020 रोजी S&P BSE SmallCap निर्देशांक 15,218.01 अंकावर ट्रेड करत होता. 08 नोव्हेंबर 2022 रोजी S&P BSE SmallCap निर्देशांकात 29,292.56 पर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे.मागील दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, आज त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.48 लाख रुपये झाले आहे.
MDF उत्पादक कंपनी
ग्रीन पॅनेल इंडस्ट्रीज कंपनी पूर्वी ग्रीन पॅनेलमॅक्स या नावाने ओळखली जात होती. ही कंपनी भारतातली सर्वात मोठी MDF उत्पादक कंपनी असून लाकूड पॅनेलची निर्मिती करणारी भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनीही आहे. उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश राज्यतील अत्याधुनिक उत्पादन केंद्रात मध्यम घनता असलेले फायबर बोर्ड, प्लायवुड, ब्लॅक बोर्ड, लिबास, लाकडी मजले आणि दरवाजे बनवण्याचे काम केले जाते.
चालू आर्थिक वर्षाच्या नुकताच संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल वार्षिक 8.31 टक्के वाढीसह 457.2 कोटी रुपयांवर गेला आहे. त्याचप्रमाणे कंपनीची बॉटम लाईन 8 टक्के वाढीसह 72.46 कोटी रुपयेवर गेली आहे. ही कंपनी सध्या 25.9x च्या इंडस्ट्री PE च्या तुलनेत 15.93x च्या TTM PE वर ट्रेड करत आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये या कंपनीचे ROE आणि ROCE प्रमाण अनुक्रमे 28.5 टक्के आणि 30.3 टक्के होते. ही कंपनी अ गटातील शेअर्सचा एक घटक असून तिचे मार्केट कॅप 4,599.14 कोटी रुपये आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकची ओपनिंग किंमत 370.10 रुपये होती. आणि नंतर स्टॉक 387.95 रुपये ची पातळी स्पर्श केल्यावर पुन्हा 370.10 रुपये वर आला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे 24,864 शेअर्स ट्रेड झाले होते. सकाळी मार्केट खुला झाल्यावर 11.28 वाजता ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 377.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक आदल्या दिवशी 381.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. बीएसई निर्देशांकावर या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 625 रुपये आहे. तर या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 350.30 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of Greenpanel Industries Ltd share price return on 11 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार