22 November 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Nykaa Share Price | नायका कंपनीने दिले मोफत बोनस शेअर्स आणि शेअर तुफान तेजीत, आता हा स्टॉक खरेदी करावा का?

Nykaa share price

Nykaa Share Price | नायकाची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures Ltd चे शेअर्स NSE निर्देशांकावर इंट्राडे सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज या कंपनीचा शेअर 186.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. BSE निर्देशांकावर सुरुवातीच्या काही तासात नायका कंपनीचे शेअर्स 7 टक्के कमजोर झाले होते. 10 नोव्हेंबर 2022 रोजी नायका कंपनीच्या शेअर्सचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाला होता. म्हणजेच, IPO येण्या आधीचे गुंतवणूकदार लॉक-इन कालावधी संपल्यानंतर स्टॉक विकून बाहेर पडतील. दुसरीकडे नायका कंपनीचे शेअर्स आज एक् बोनस तारीखवर ट्रेड करत होते. नायका कंपनी उद्या आपल्या सर्व पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स फ्री वाटप करणार आहे.

बोनस शेअर्सचे वाटप :
नायका कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना फ्री बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. नायकाने बोनस शेअर वाटप करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. यापूर्वी कंपनीने 3 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती, मात्र त्यात नंतर बडल करण्यात आला होता. नायका आपल्या विद्यमान स्टॉक धारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करणार आहे. म्हणजेच प्रत्येक 1 शेअरमागे भागधारकांना 5 बोनस शेअर्स मोफत दिले जातील.

IPO मध्ये पैसे लावणारे निराश झाले :
नायका कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. त्यानंतर शेअरची किंमत 1125 रुपये पर्यंत पडली होती. नायका शेअर्सची लिस्टिंग जबरदस्त किमतीवर झाली होती. 10 नोव्हेंबर 2021 रोजी नायका कंपनीचा शेअर 2001 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी हा शेअर 96 टक्क्यांच्या वाढीसह 2207 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील वर्षी नायका कंपनीच्या शेअरने 2574 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. पण नंतर शेअर्समध्ये सातत्याने पडझड सुरू झाली आणि स्टॉक IPO किमतीच्या तुलनेत 50 टक्के किमतीवर आला होता.

कंपनीचे तिमाही निकाल :
नायका कंपनीने जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत उत्कृष्ट नफा केला आहे. नायका कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 5.2 कोटीचा एकत्रित निव्वळ नफा कमावल्याचे जाहीर केले आहे. नायका कंपनीने एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 1 कोटी रुपयेचा निव्वळ नफा कमावला होता. एका वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 330 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, जून तिमाहीत नायका कंपनीने 5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa share price Return on investment after announcing Quarterly Results 12 November 2022.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x