25 November 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Drishyam 2 | 'दृश्यम 2'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची जोरदार चर्चा, विकली गेली इतकी हजार तिकिटं

Drishyam 2

Drishyam 2 | बॉयकॉटच्या काळात बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर मृत्यू झाला आहे. आता या सिनेमांसाठी ओटीटी हाच एकमेव आधार उरला आहे. अशा परिस्थितीत अजय देवगणच्या आगामी ‘दृश्यम 2’ या सिनेमाशी अनेकांच्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत. अजय देवगन, श्रिया सरन आणि तब्बू स्टारर ‘दृश्यम २’ या सिनेमामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठकचा हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात धडकणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे.

उत्तम अ‍ॅडव्हान्स बुकिंग
‘दृश्यम 2’ प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगनं झेंडा रोवलाय. आम्ही तुम्हाला सांगतो की, अजय देवगनचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट 18 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानं प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत ‘दृश्यम 2’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या 3 नॅशनल चेन्सनी ओपनिंग विकेंडसाठी ‘दृश्यम 2’ची 35,332 तिकिटांची विक्री केली आहे. सिनेमाच्या अशा अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे अजयच्या आधीच्या ‘रनवे 34’ आणि ‘थँक गॉड’ या सिनेमांचा रेकॉर्डही मोडला आहे. मात्र , ‘दृश्यम 2’ च्या प्रदर्शनाला अजून 4 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चित्रपटाला यूए प्रमाणपत्र मिळाले
अजय देवगन आणि तब्बू यांच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यूए प्रमाणपत्र दिलं आहे. १४२ मिनिटांच्या म्हणजेच २ तास २२ मिनिटांच्या कथेत प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे. विजय साळगावकर (अजय देवगन) यांचं प्रकरण पुन्हा एकदा सिनेमात उघडणार आहे. यावेळी अक्षय खन्नाही या चित्रपटात दिसणार आहे, जो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Drishyam 2 movie advace ticket booking check details on 14 November 2022.

हॅशटॅग्स

Drishyam 2 Trailor Out(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x