21 November 2024 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ATM Cash Withdrawal | तुम्ही युपीआयच्या मदतीने कार्ड नसतानाही ATM मधून पैसे काढू शकता, फॉलो करा या स्टेप्स

ATM Cash Withdrawal

ATM Cash Withdrawal | बऱ्याच लोकांना पैशांची गरज असते मात्र त्यांच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसते. तुमच्या कडेही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसेल पण तुम्हाला ATM मधून पैसे काढायचे असेल तर आता काळजी करू नका. UPI ने आता तुमच्या या समस्येवर एक तोड आणला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने कार्डलेस व्यवहार सुरू केले असून ज्या लोकांकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नाही अशा लोकांच्या आता बिना कार्ड ATM मधून पैसे काढता येतील अशी सुविधा सुरू केली आहे. तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे UPI सुविधा राबवली जाते. या नवीन सुविधेमुळे तुम्ही आता UPI द्वारे ATM मधून पैसे काढू शकता. इंटर ऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल/ICCW याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आता डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसतानाही एटीएममधून सहज पैसे लढू शकता.

UPI वापरून ATM मधून कॅश काढा :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/RBI ने क्लोनिंग, स्किमिंग आणि डिव्हाइस टॅम्परिंग सारखे फसवणूक टाळण्यासाठी सर्व बँकांना ATM साठी ICCW पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक आणि इतर बँकाद्वारे चालवल्या जाणार्‍या एटीएम सेवामध्ये कार्डलेस कॅश विथड्रॉवल पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

UPI चा वापर करून आता ATM मधून कॅश काढणे सोपे झाले आहे. कोणत्याही UPI पेमेंट सेवा प्रदाता अॅपद्वारे तुम्ही हा सेवेचा लाभ घेऊ शकता. तुमच्याकडे जर GooglePay, PhonePe, Paytm किंवा इतर UPI अॅप्स असतील तर तुम्ही त्याचा वापर करून ATM मधून पैसे काढू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला UPI द्वारे ATM मधून कॅश काढायची याची सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ.

स्टेप बाय स्टेप प्रक्रिया.
* कोणत्याही एटीएम मशीनवर जाणून स्क्रीनवर उपलब्ध ‘Withdraw Cash’ हा पर्याय निवडा.
* पुढे, UPI पर्याय निवडा, नंतर एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल.
* तुमच्या स्मार्टफोनवर UPI अॅप्लिकेशन ओपन करा. आणि एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा.
* तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे तो आकडा टाका. तुम्ही UPI द्वारे कमाल 5,000 कॅश काढू शकता.
* नंतर तुमचा UPI पिन एंटर करा आणि ‘प्रोसीड’ बटणावर क्लिक करा.
* तुमची कॅश तुम्हाला भेटेल. अशाप्रकारे तुम्ही एटीएम मशीनमधून कार्ड नसतानाही पैसे कधी शकता.

या सुविधेचा एक जबरदस्त फायदा असा आहे की, बँका UPI द्वारे एटीएममधून पैसे काढण्यावर कोणताही अतिरिक्त शुल्क आकारणार नाहीत. कोणत्याही बँकेच्या ATM मधून विना कार्ड UPI वापरून कॅश काढण्यावर शुल्क हे सध्याच्या कार्डमधून पैसे काढण्यासाठी लागणाऱ्या शुल्काप्रमाणेच राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, “ऑन-यूएस/ऑफ-यूएस ICCW व्यवहारांवर विहित इंटरचेंज फी आणि ग्राहक शुल्काशिवाय प्रक्रिया केली जाईल.” ग्राहकांना त्यांच्या संबंधित बँकांच्या ATM मधून एका महिन्यात पाच वेळा विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी असते. आणि इतर बँकांच्या एटीएममधून तीन वेळा विनामूल्य कॅश काढण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी 21 चार्ज आकारला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ATM Cash Withdrawal trick with the help of UPI id on 14 November 2022.

हॅशटॅग्स

#ATM Cash Withdrawal(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x