22 November 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tourist Travel Permit | केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल, छोट्या ट्रॅव्हल एजन्सींना फायदा, पैशांची बचत होणार

Tourist Travel Permit

Tourist Travel Permit | पर्यटन परवानगी व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पावले उचलली आहेत. मंत्रालयाने अखिल भारतीय पर्यटक वाहन प्राधिकरण आणि परमिट नियम – 2021 च्या जागी नवीन नियम लागू करण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या नियमांमुळे पर्यटकांच्या वाहनांसाठी परमिट व्यवस्था सुव्यवस्थित आणि सुलभ करून देशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली.

मसुदा जाहीर
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी मसुदा अधिसूचना जारी केली. प्रस्तावित नियम अखिल भारतीय पर्यटक वाहन प्राधिकरण आणि परमिट नियम, 2021 ची जागा घेईल. आता प्रस्तावित ऑल इंडिया टुरिस्ट व्हेइकल (परमिट) नियम-2022 मुळे पर्यटन परवानगी व्यवस्था अधिक चांगली आणि मजबूत होणार आहे.

आर्थिक दिलासा मिळण्याची आशा
प्रस्तावित नियमांचा उद्देश अखिल भारतीय परमिट अर्जदारांसाठी प्रक्रिया सुलभ करणे आणि अनुपालनाचे ओझे कमी करणे हा आहे. कमी क्षमतेच्या वाहनांसाठी (दहापेक्षा कमी) कमी परमिट फी असलेल्या पर्यटक वाहनांच्या अधिक श्रेणी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. या निर्णयामुळे कमी आसन क्षमतेची छोटी वाहने असलेल्या पर्यटक चालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांना आता त्यांच्या वाहनाच्या आसन क्षमतेच्या तुलनेत कमी शुल्क भरावे लागणार आहे.

PIB

नियामक वातावरण
निवेदनानुसार, मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रचालकांना सुसंघटित नियामक वातावरण उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यावर संबंधित पक्षकारांना 30 दिवसांच्या आत टिप्पण्या आणि सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tourist Travel Permit issues draft notification to improve tourist permit system check details on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#Tourist Travel Permit(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x