Multibagger Stocks | बंपर रिटर्न अलर्ट! या शेअरने दिला 900 टक्के परतावा, पुढेही स्टॉक पैसे वाढवणार, डिटेल वाचा
Multibagger Stocks | भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी आनंद राठी यांनी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता, त्यात दीपक नायट्रेट लिमिटेड कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 2,650 रुपये निश्चित करण्यात आली होती. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, हा स्टॉक पुढील काळात 24 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. दीपक नायट्रेट कंपनीचे बाजार भांडवल 29,140.37 कोटी रुपये असून ही एक मिड कॅप कंपनी आहे जी केमिकल क्षेत्रात उद्योग करते. हा केमिकल स्टॉक काही कालावधीत लोकांना 24 टक्के परतावा कमावून देईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही या स्टॉकमध्ये 4 लाख रुपये लावले तर तुम्हाला 5 लाख रुपये परतावा मिळू शकतो. दीपक नायट्रेट ही गुजरात राज्यात स्थित असून ती रासायन उत्पादन आणि वितरण करण्याचे काम करते. कंपनी मुख्यतः जबाबदार आणि टिकाऊ पद्धतीने बनवलेल्या उच्च-गुणवत्तेची रासायनिक उत्पादने तयार करते, त्यामुळे कंपनीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मजबूत उपस्थिती प्राप्त झाली आहे.
मजबूत परतावा देणारा स्टॉक :
दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. बीएसई निर्देशांकावर 17 नोव्हेंबर 2017 रोजी स्टॉक या कंपनीचा शेअर 212.25 रुपयेवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक दिवसा अखेर 2136.50 रुपयांवर क्लोज झाला होता. या कालावधीत हा शेअर जवळपास 906.60 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. म्हणजेच अल्पावधीत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 10 पट अधिक वाढवले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 10.06 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
2 वर्षांचा परतावा :
दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना शानदार परतावा मिळवून दिला आहे. 20 नोव्हेंबर 2020 रोजी बीएसई इंडेक्सवर हा स्टॉक 810.90 रुपयेवर ट्रेड करत होता, तर आज हा स्टॉक 2136.50 रुपयेवर पोहचला आहे. या कालावधीत शेअरची किंमत जवळपास 163.5 टक्क्यांनी वधारली आहे. म्हणजेच, अल्पावधीत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. झाले. गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.63 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
गुंतवणुकीवर 51500 टक्के परतावा :
दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकने बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी बीएसई इंडेक्सवर हा स्टॉक 4.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, मात्र आज हा स्टॉक 2136.50 रुपयांवर पोहचला आहे. या कालावधीत स्टॉकची किंमत सुमारे 51,506.28 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या पैशात 516 पट वाढ पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 5.16 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
इतर कालावधीत मिळणारा परतावा :
मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 0.12 टक्क्यांनी घसरला आहे. आजही स्टॉकमध्ये 2.38 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. हा शेअर गेल्या 1 महिन्यात 5.31 टक्क्यांनी पडला आहे. मागील 6 महिन्यांत स्टॉकमध्ये 4.15 टक्क्यांची वाढ झाली होती. 2022 मध्ये स्टॉकची किंमत 15.55 टक्क्यांनी खाली पडली होती. गेल्या 1 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6.99 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,690.05 रुपये आहे आणि त्याची नीचांक किंमत पातळी 1682.15 रुपये होती.
कंपनीचा उद्योग :
दीपक नायट्रेट कंपनीचे उत्पादन सुविधा केंद्र गुजरातमधील नंदेसरी आणि दहेज, या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात रोहा आणि तळोजा आणि तेलंगणामध्ये हैदराबाद हा ठिकाणी ही कंपनीचे उत्पादन केंद्र कार्यरत आहेत. दीपक नायट्रेट कंपनी ऍग्रोकेमिकल्स, कलरंट्स, रबर, फार्मास्युटिकल्स, विशेष आणि सूक्ष्म रसायनांसह रसायनांचे स्पेक्ट्रम तयार करते. या कंपनीने 1971 मध्ये आपला IPO शेअर बाजारात खुला केला होता. त्यावेळी हा IPO 20 पट अधिक ओव्हरसबस्क्राइब झाला होता. 1984 मध्ये या कंपनीने मफतलाल इंडस्ट्रीजकडून सह्याद्री डायस्टफ्स आणि केमिकल्स युनिट खरेदी केले होते. कंपनीने 1995 मध्ये मुंबई नजिक तळोजा येथे हायड्रोजनेशन प्लांटची सुरुवात केली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of Deepak Nitrate share price return on investment on 18 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार