25 November 2024 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Money From IPO | मस्तच! आयपीओ हलक्यात घेऊ नका, लिस्टिंग दिवशीच 112 रुपयांचा प्रॉफिट, पुढे पैसे लावणार?

Money From IPO

Money From IPO | Archean Chemicals ही विशेष रसायने उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या IPO मधील शेअर्सचे वाटप निश्चित केले आहेत. आता सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष Archean Chemicals कंपनीच्या शेअर्सच्या लिस्टिंगवर लागले आहे . Archean Chemicals कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीचा IPO 32.23 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्येही कंपनीच्या शेअर्सची किंमत प्रिमियमवर ट्रेड करत होती. आर्कियन केमिकल कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत सातत्याने वाढत चालली आहे.

आर्कियन केमिकलची ग्रे मार्केट किंमत :
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, Archean Chemicals कंपनीच्या शेअर्सची किंमत 112 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. Archean Chemicals कंपनीचे शेअर्स सोमवारी 21 नोव्हेंबर 2022 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होतील. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 386 रुपये ते 407 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. जर Archean केमिकल कंपनीचे शेअर्स 112 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत राहिले तर हे शेअर्स 519 रुपये किंमत पातळीवर सूचीबद्ध होतील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

दिग्गज गुंतवणूकदारांची मोठी बाजी :
Archean केमिकल कंपनीने आपल्या पब्लिक इश्यूपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 658 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. या केमिकल कंपनीने 16167991 शेअर्स ॲकर गुंतवणूकदारांना 407 रुपये प्रति शेअर दराने विकले आणि 658 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. गोल्डमन सॅक्स, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, बीएनपी परीबस, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, डीएसपी स्मॉल कॅप फंड, टाटा म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया एमएफ, आदित्य बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स यासारख्या दिग्गज मोठ्या गुंतवणूक कंपनीने अँकर बुक्सद्वारे Archean कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

Archean केमिकल कंपनीच्या IPO मध्ये 805 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स इश्यू करण्यात आले आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांद्वारे 1.61 कोटी शेअर्सचे ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी केले जाणार आहेत. IPO मधून मिळणारी रक्कम कंपनी नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या पूर्ततेसाठी वापरण्याचा विचार करत आहे. या कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा उपलब्ध राखीव कोटा 48.91 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ठेवलेला उपलब्ध राखीव कोटा 14.90 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 9.96 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From IPO of Archean Chemicals limited share price return on investment on 19 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x