16 April 2025 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

SIP Calculator | काय सांगता! फक्त 17 रुपये गुंतवून करोडमध्ये परतावा? अशी करा म्युच्युअल फंडात बचत, गणित समजून घ्या

SIP calculator

SIP Calculator | आजकाल आपल्यासाठी आपल्या कुटुंबाच्या सुखद भविष्याची आर्थिक रूपरेषा तयार करणे ही काळाची गरज बनली आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण आल्यास आपल्याला कोणापुढे हाथ पसरावे लागू नये, त्यासाठी जी आपण सोय करून करून ठेवतो, यालाच भविष्यातील आर्थिक नियोजन करणे असे म्हणतात. भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यासाठी कोणतेही वय किंवा मर्यादा नसते. जेवढ्या लवकर गुंतवणुकीसाठी सुरुवात कराल, तेवढे चांगले. मात्र, तरुण वयात सुरू केलेली गुंतवणूक तुम्हाला निवृत्तीच्या वेळी खूप मोठा आधार देऊ शकते. जर तुम्ही अजूनही तुम्ही गुंतवणूक सुरू केली नसेल तर तुम्हाला आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

जेव्हा आपण कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरू करतो, त्यापूर्वी कोणत्याही जाणकार किंवा तज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. गुंतवणुक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची पूर्ण माहिती घ्या. जोखीम आणि सर्व धोके तपासा. ज्यां योजनेबद्दल जास्त माहीत नाही, त्यात पैसे जमा करू नका, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

दरमहा 500 रुपये गुंतवणूक :
आज या लेखात आम्ही तुम्हाला अल्प बचत करून मोठा फंड कसा तयार करतात, याची सविस्तर माहिती देणार आहोत. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवण्याचा विचार केला असेल तर, तुम्हाला दररोज 17 रुपये बचत करावे लागेल. आणि या प्रमाणे तुम्ही SIP मध्ये दरमहा 500 रुपये सहज जमा करू शकता.

20 टक्केहून अधिक परतावा :
जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू केली तर दीर्घ काळात तुम्ही करोडपती होऊ शकता. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये दररोज 17 रुपये म्हणजेच मासिक 500 रुपये गुंतवावे लागेल. मागील काही वर्षांत या म्युच्युअल फंड एसआयपी योजनानी आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्केहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

20 वर्षात पैसा इतका वाढेल :
जर तुम्ही दररोज 17 रुपये प्रमाणे म्हणजेच एका महिन्यात 500 रुपये 20 वर्षांसाठी जमा केले तर तुमची वार्षिक गुंतवणूक 6 हजार रुपये होईल. आणि 20 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 1.2 लाख रुपये जमा होईल. 20 वर्षांत तुम्हाला 15 टक्के वार्षिक व्याज दराने परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 7 लाख 8 हजार रुपये होईल. जर आपण 20 टक्के वार्षिक परताव्यानुसार गणना केली तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 15.80 लाख रुपये होईल.

30 वर्षांत मिळणारा परतावा :
जर तुम्ही या म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीचा कालावधी 30 वर्षापर्यंत निश्चित केला तर या काळात तुमची एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये जमा होईल. जर तुम्हाला यावर 30 वर्षांसाठी 20 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळाला तर तुमच्या कडे 1.16 कोटी रुपयेचा मोठा फंड तयार होईल. या म्युच्युअल फंड SIP मधील गुंतवणूकीवर गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. यामध्ये तुम्ही दर महिन्याला अल्प गुंतवणूक करू शकता. हेच कारण आहे की अल्प गुंतवणुकीवर म्युचुअल फंड SIP मधे मोठा परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SIP calculator for counting Mutual fund SIP returns in long term on 19 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या