22 November 2024 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

TTML Share Price | टाटा के साथ नो घाटा, टाटा ग्रुपचा शेअर खूप स्वस्त झालाय, पुढे मोठा परतावा देऊ शकतो, कारण काय?

TTML share price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेली TTML कंपनी ज्याचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आहेत, या कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर ट्रेड करत आहेत. तथापि टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ज्या लोकांनी या टाटा समूहातील या TTML कंपनीत पैसे लावले होते, त्यांच्या एक लाख रुपये गुंतवणूकीचे मूल्य आता 50,000 रुपयांपेक्षा कमी झाले आहे.

टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षात आतापर्यंत 50.83 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत, आणि 102.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 3 जानेवारी 2022 रोजी TTML कंपनीचा स्टॉक 216.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. यानंतर, 11 जानेवारी 2022 रोजी स्टॉकची किंमत 290.15 रुपये या आपल्या सार्वकालिंग उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. यानंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि 8 मार्च 2022 रोजी शेअर्स 93.55 रुपयांपर्यंत खाली पडला होता. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर्स वधारले होते. स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर लावून 102.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. TTML कंपनीने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 27.67 टक्के परतावा मिळवून दिला होता. जर आपण मागील 5 वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या शेअरने लोकांना सुमारे 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे .

TTML कंपनीचा व्यवसाय :
TTML ही Tata Teleservices या कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी आपल्या सेक्टरमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. TTML कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस आणि डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठया कंपनीचे नाव सामील आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मागील महिन्यात या कंपनीने आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली होती. या कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा सुविधा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण मिळत असल्याने कंपनीला मोठ्या प्रमाणत उदंड प्रतिसाद मिळत आहे.

क्लाउड आधारित IT सेवा सुरक्षा हे TTML कंपनीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, जेणेकरून आपल्या ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवला जाईल. भाडेतत्त्वावर डिजिटल आधारावर चालत असलेल्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे . यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अंगभूत सुरक्षा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे, आणि त्यासोबतच ग्राहकांना वेगवान इंटरनेट सुविधाही पुरवण्यात येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| TTML share price return on investment on 19 November 2022.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x