3 December 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

भारतीयांनो! महागाई किंवा बेरोजगारी नव्हे, आता पंतप्रधान मोदी निवडणुक प्रचारात चक्क इंटरनेट मोबाईल डेटावर मतं मागत आहेत

Vote for Mobile Data

Vote For Mobile Data | गुजरात निवडणुका जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्ष प्रभावशाली पाटीदार समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने १८२ सदस्यांच्या विधानसभेसाठी ४५ पाटीदारांना उमेदवारी दिली आहे, तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने ४२ पाटीदार उमेदवार उभे केले आहेत. आम आदमी पक्षानेही (आप) समाजातील ४६ नेत्यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

शेतकरी जमीनदारांचा सर्वात मोठा समुदाय :
पाटीदार हा राज्यातील जमीनदारांचा सर्वात मोठा समुदाय आहे. ही एक शेतीची जात आहे, त्यात अनेक पोटजातींचा समावेश आहे. सर्वात ठळकपणे लेउवा आणि कडवा पटेल आहेत. १९५० च्या दशकात सौराष्ट्र जमीन सुधारणा कायदा, १९५२ पासून या समुदायाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला, ज्याने भाडेकरू शेतकऱ्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला, जे मुख्यत: पटेल समाजातील होते.

वलसाड जिल्ह्यात सभेत
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वलसाड जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना सांगितले की, या राज्यातील गुजराती लोकांनी कधीही कुणालाही दुखावले नाही, आणि जो कोणी गुजरातमध्ये येईल त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले आहे आणि त्याला प्रेमाने, मायेने जवळ घेतले आहे. मात्र ज्या लोकांकडून गुजरातची बदनामी केली जाते आहे. आमच्या विरोधात बोलले जात आहे.

गुजरात विधानसभा तोंडावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गुजरातच्या जनतेने कधीही कुणालाही दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. गुजराती माणसं कुठेही गेली तर ती दुधात साखर विरघळल्यासारखे मिसळून जातात. आणि आमच्या राज्यात जर कोणी बाहेरची लोकं आली तर त्याला प्रेमानं जवळ घेतात, मायेनं मिठी मारतात असंही नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले.

महागाई – बेरोजगारीवरीमुळे आता मोबाईल डेटावर मतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वीच्या काँग्रेसच्या राजवटीत एक जीबी डेटा हा 300 रुपयेला होता. आता त्याची किंमत फक्त 10 रुपये आहे आणि सध्या मासिक डेटा वापराचे बिल 250 ते 300 रुपये आहे. आणि जर या काळात काँग्रेस सत्तेत आली असती तर 5000 रुपयांपेक्षा जादा दर घेतले असते. तर या निवडणुकीत भाजप विजयाचा नवा इतिहास रचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vote for Mobile Data in Gujarat Assembly Election 2022 check details on 20 November 2022.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x