23 November 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Mutual Fund | कडक! या फंडाच्या योजनेने 10,000 रुपयांच्या SIP वर 13 कोटी रिटर्न दिला, श्रीमंत करणारी योजना नोट करा

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | आज या लेखात आपण ज्या म्युचुअल फंडची माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, “फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड”. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड असून तो मुख्यतः मिड-कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे लावतो. या म्युचुअल फंडाची मिड-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये 65 टक्के गुंतवणूक कार्यरत आहे. आणि हा फंड मिड कॅप फंड म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. 1 डिसेंबर 1993 रोजी या म्युचुअल फंडाची सुरुवात झाली होती आणि आता या म्युचुअल फंडला 29 वर्षे पूर्ण झाले आहेत. या म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षांत सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर वार्षिक लाभांश वाटप केला आहे.

फ्रेंकलिन इंडिया प्राइमा फंडाचे SIP रिटन्स :
31 ऑक्टोबर 2022 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेने लोकांना सरासरी वार्षिक 13.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत एका वर्षात 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केल्यास 1.20 लाख रुपये गुंतवणूक रकमेवर वार्षिक 1.28 लाख रुपये परतावा मिळतो. तीन वर्ष कालावधीत 10,000 रुपयेच्या मासिक SIP गुंतवणुकीवर 3.60 लाख रुपये गुंतवणूक रक्कम जमा होते, आणि त्यावर 4.92 लाख परतावा मिळू शकतो. या कालावधीत म्युचुअल फंड योजनेने लोकांना सरासरी वार्षिक 21.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील पाच वर्षांत लोकांना सरासरी वार्षिक 15.56 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या दरम्यान मागील 7 वर्षांत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूकीवर 6 लाख गुंतवणूक रक्कम जमा होते, आणि त्यावर 13.82 टक्के दराने 8.85 लाख रुपये परतावा मिळतो.

10 वर्षांचा परतावा :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 15.59 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच 10 वर्षांसाठी 10,000 रुपयेच्या मासिक SIP गुंतवणुकीवर एकूण 12 लाख गुंतवणूक रक्कम जमा होते, आणि त्यावर 27.15 लाख परतावा मिळतो. या म्युचुअल फंडाने मागील 15 वर्षांत लोकांना 16.57 टक्के दराने वार्षिक परतावा कमावून दिला आहे. 20 वर्षात मासिक 10,000 रुपये SIP पद्धतीने गुंतवणूक केल्यास 18 लाख रुपये गुंतवणूक रक्कम जमा होते, आणि त्यावर 70.70 लाख रुपये परतावा मिळतो. या म्युचुअल फंडाने सुरुवातीपासून आतापर्यंत लोकांना 20.06 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. त्यामुळे 10,000 रुपयेच्या मासिक SIP ने 34.70 लाख रुपये गुंतवणूक रक्कम जमा झाली असती आणि त्यावर 13 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड बद्दल थोडक्यात :
या म्युचुअल फंडाचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो 36.19 टक्के नोंदवण्यात आला आहे. फंडाचा बीटा रेशो 0.90 टक्के आणि शार्प रेशो 0.46 टक्के आहे. हा म्युचुअल फंड मुख्यतः बँक सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन, किरकोळ विक्री आणि वितरण, वित्त आणि हेल्थकेअर सेवांमध्ये गुंतवणूक करतो. या म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंगमध्ये फेडरल बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, दीपक नायट्रेट लिमिटेड, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड याचा समावेश होतो. या म्युचुअल फंडाचे इक्विटी सिक्युरिटीजमध्ये 96.93 टक्के एक्सपोजर आहे. आणि 16.4 टक्के रक्कम लार्ज कॅप स्टॉक मध्ये गुंतवली आहे. 68.14 टक्के गुंतवणूक मिड कॅप स्टॉकमध्ये आणि 12.39 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप स्टॉकमध्ये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual Fund Scheme of Franklin India Prima Fund investment Opportunities and benefits on 21 November 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x