18 April 2025 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Stock in Focus | दिग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केलेला शेअर 65 टक्के स्वस्त होताच सामान्य गुंतवणूदारांची खरेदीसाठी झुंबड, कारण?

Stock in Focus

Stock In Focus | Nazara Technology लिमिटेड कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह 603 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागील एक मोठे कारण समोर आले आहे. Nazara Technology कंपनीने अॅब्सोल्युट स्पोर्ट्स कंपनीमध्ये 19.99 कोटी रुपये गुंतवणूक करून 5.71 टक्के वाटा खरेदी केला आहे. यानंतर शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. Nazara Technologies ही कंपनी भारत आणि जगभरातील ग्राहक आधारित गेम/कंटेंट आणि डिजिटल सेवांचे सबस्क्रिप्शन/डाउनलोड या उद्योगात कार्यरत आहे.

डीलची माहिती सविस्तर :
15 नोव्हेंबर 2022 रोजी Nazara Technologies या कंपनीने Absolute Sports या कंपनीमध्ये 19.99 कोटी रुपये गुंतवणूक करून प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 12,323 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. प्रॉफिटेबल उपकंपन्यांमधील शेअरहोल्डिंग मजबूत करण्याच्या उद्देशाने ही गुंतवणूक करण्यात आली आहे. या गुंतवणुकीमुळे Nazara Tech कंपनीची Absolute Sports कंपनीमधील इक्विटी शेअर्स होल्डिंग 65.00 टक्के वरून वाढून 70.71 टक्के पर्यंत गेली आहे.

कंपनीचा स्टॉक आउटलुक :
22 जून 2022 रोजी Nazara Technologies कंपनीच्या स्टॉकने 484 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 11 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 1,677 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या कंपनीचा स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 65 टक्के खाली पडला आहे. त्याच वेळी या वर्षी YTD आधारे या स्टॉकमध्ये आतापर्यंत 50 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. या दरम्यान स्टॉक 1201.78 रुपयांवरून सध्याच्या ट्रेडिंग किमतीपर्यंत खाली पडला आहे.

कंपनीचे डिटेल :
या कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. Nazara Tech ही एक ऑनलाइन गेमिंग कंपनी असून मागील वर्षी मार्चमध्ये ती शेअर बाजारात लिस्ट झाली आणि कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग सुरू झाली. Nazara Technologies कंपनीचा IPO 79 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 1101 रुपये होती. NSE इंडेक्सवर हा स्टॉक 926.75 रुपये आणि BSE इंडेक्सवर 1971 रुपये किमतीवर लिस्ट झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nazara Technology stock in Focus after Having Investment Deal with Absolute Sports on 21 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या