22 November 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

NDTV Share Price | एनडीटीव्हीचा ताबा गौतम अदानी घेणार, ओपन ऑफरची किंमत पहा आणि खरेदी करा शेअर्स, कारण?

NDTV Share Price

NDTV Share Price | भारतीय मीडिया कंपनी NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के मालकी वाटा खुल्या बाजारातून विकत घेण्याची अदानी समूहाची ओपन ऑफर आजपासून सुरू झाली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी उद्योगसमूहातील कंपन्यांच्या वतीने या ओपन ऑफरचे व्यवस्थापन करणाऱ्या जेएम फायनान्शिअल फर्म ने एका निवेदनात महितींडीली आहे की, ही ओपन ऑफर 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू केली जाईल, आणि 5 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली राहील. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोमवारी NDTV कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत होते. .या कंपनीचे शेअर काळ दिवसा अखेर 382.20 रुपये किमतीवर बंद झाले होते.

ओपन ऑफरचा किंमत आधार :
अदानी ग्रुपने या ओपन ऑफरसाठी लोकांना 294 रुपये प्रति शेअर किंमत देऊ केली आहे. 7 नोव्हेंबर 2022 रोजी NDTV कंपनीमधील अतिरिक्त स्टेक खरेदी करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया/SEBI या स्टॉक मार्केट नियामकने अदानी समूहाच्या 492.81 कोटी रुपयेच्या ओपन ऑफरचा प्रस्ताव मंजूर केला होता.

प्रकरण थोडक्यात :
प्रसिद्ध उद्योगपती आणि भारतातील सर्वात व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी उद्योग समूहाने ऑगस्ट 2022 मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड/VCPL या कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले होते. VCPL या कंपनीने एक दशकापूर्वी NDTV कंपनीच्या संस्थापकांना 400 कोटी रुपयांहून जास्त कर्ज दिले होते, आणि या कर्जाच्या बदली एनडीटीव्हीच्या संस्थापकांनी VCPL या कर्जदाराला NDTV मधील 29.18 टक्के शेअर्स कधीही ताब्यात घेण्याची मुभा दिली होती.

ओपन ऑफर सुरू :
गौतम अदानी यांच्या उद्योग समुहाने VCPL कंपनीचा ताबा घेतला. 17 ऑक्टोबर 2022 रोजी NDTV च्या छोट्या शेअर धारकांकडून अतिरिक्त 26 टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी आता अदानी ग्रुपने ओपन ऑफर जाहीर केली आहे, नी आजपासून सुरू झाली आहे. VCPL सह AMG मीडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड हे एकत्र येऊन एनडीटीव्ही मधील 26 टक्के शेअर्स खरेदी करणार आहे. या ओपन ऑफर अंतर्गत अदानी समूह 1.67 कोटी शेअर्स 294 रुपये प्रति शेअर या किमतीवर खुल्या बाजारातून खरेदी करणार आहे. ओपन ऑफरचा आकार 492.81 कोटी रुपये एवढा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| NDTV Share Price has fallen down after the Open Offer has started to accumulate majority share in company on 22 November 2022

हॅशटॅग्स

#NDTV Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x