24 November 2024 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Quick Money Share | नशीब फळफळले, 5 दिवसात कमावला 91 टक्के परतावा, श्रीमंत करणारे 5 स्टॉक सेव्ह करा

Quick Money Share

Quick Money Share | मागील चार आठवडे शेअर बाजार हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता, पण आता या आठवड्याच्या सुरुवातीला बाजार पडला. किरकोळ तोट्यासह मागील अस्थिर आठवड्याचा शेवट झाला. बीएसई निर्देशांक 100 अंकांच्या पडझडीसह 61,663 अंकावर ट्रेड करत होता. आणि निफ्टी-50 मध्ये 40 अंकांची पडझड झाली होती, आणि निफ्टी 18,308 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 1.5 टक्के आणि 1 टक्क्यांच्या पडझडीसह ट्रेड करत होते. मागील आठवड्यात क्षेत्रीय कल संमिश्र होता. गेल्या आठवड्यात बँकिंग आणि वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञान शेअर्स वाढीसह ट्रेड करत होते. ऑटो, एफएमसीजी, ऊर्जा आणि फार्मा स्टॉक 1-2 टक्क्यांच्या कमजोरी सह ट्रेड करत होते. मासिक एक्स्पायरी जवळ येत असल्याने चालू आठवड्यातही बाजार अस्थिर राहण्याचे संकेत मिळत आहे. मागील आठवड्यातील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 5 शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 91.5 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल थोडक्यात

इव्हान्स इलेक्ट्रिक :
इव्हान्स इलेक्ट्रिक या स्मॉल-कॅप कंपनीचे बाजार भांडवल 26.03 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 91.5.टक्के परतावा कमावून दिला होता. हा स्टॉक 5 दिवसापूर्वी 99.05 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आगा 189.75 रुपयांवर पोहोचला आहे. मागील शुक्रवारी स्टॉकमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअर्सb189.75 रुपयांवर ट्रेड करत होते 91.5 टक्के परताव्यासह या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयेवर 1.91 लाखांपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखीनीचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

मर्क्युरी लॅब्स :
मर्क्युरी लॅब्स कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर प्रॉफिट कमवून दिला आहे. या कंपनीचा शेअर एकेकाळी 582 वर ट्रेड करत होता तो आता 924.90 रुपयेवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून सुमारे 58.92 टक्के रिटर्न कमावले आहे. या कंपनीचे बाजार भांडवल फक्त 108.46 कोटी रुपये आहे. गेल्या 5 दिवसात हा स्टॉक 58.92 टक्के वाढला असून हा परतावा FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीने चांगला मनला जातो. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 3.34 टक्क्यांच्या कमजोरीसह घसरून 924.90 रुपयांवर ट्रेड करत होता.

इनोकॉर्प :
इनोकॉर्प कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना रिटर्न देण्याच्या बाबतीतही आघाडीवर आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 46.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक काही दिवसापूर्वी 4.81 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता 7.03 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 46.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 5.58 कोटी रुपये आहे. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

आर्चिस :
आर्चीज कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमवून दिला आहे. हा स्टॉक 19.20 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 27.50 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी 43.23 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 93.06 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5.57 टक्क्यांच्या वाढीसह 43.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

मॉडर्न डायरी :
मॉडर्न डायरी या कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना खुश केले होते. त्याचा स्मॉल कॅप स्टॉक 12.45 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 17.41 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या शेअरमध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी 39.84 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 39.89 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 17.41 रुपयांवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 5 Quick Money Share list makes Multibagger returns in short time on 22 November 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x